एक्स्प्लोर

सोन्याच्या दराचा नवा उच्चांक, सोनं 50 हजार पार

कोरोना काळात देखील सुरु लग्न सराईच्या ऐन हंगामात सोन्याच्या दराने नवा उच्चांक गाठला आहे. मुंबईत प्रतितोळा सोन्यासाठी नागरिकांना तब्बल 50 हजार 282 रुपये मोजावे लागणार आहेत.

मुंबई:  लग्न सराईच्या ऐन हंगामात सोन्याच्या दराने नवा उच्चांक गाठला आहे. मुंबईत प्रतितोळा सोन्यासाठी नागरिकांना तब्बल 50 हजार  282 रुपये मोजावे लागणार आहे. यासाठी जीएसटी जवळपास 1500 रुपयांच्या आसपास भरावा लागणार आहे. त्यामुळे नागरिकांना 10 ग्राम सोन्यासाठी जीएसटी पकडून 51 हजार 782 रुपये इतकी रक्कम मोजावी लागणार आहे. या दरांत आणखी वाढ होऊन ते दसऱ्यापर्यंत 55 ते 56 हजारांच्या आसपास जाऊ शकते अशी शक्यता देखील  मुंबई ज्वेलर्स असोसिएशनकडून वर्तवण्यात येतं आहे. सोमवारी जीएसटी सोडून सोन्याचा 10 ग्रामसाठी दर 48 हजार 886 रुपये इतका होता. यामध्ये आज जवळपास 1400 रुपयांची वाढ होऊन तो  50 हजार 282 रुपये इतका झालेला आहे. एकंदरीत विचार केला तर आज सोन्याच्या दरात 10 ग्रामसाठी 1400 रुपयांची वाढ झाली आहे. यासोबतच जुलै महिन्याच्या पहिल्याचं दिवशी चांदी देखील 50 हजारांच्या पूढे गेली आहे. आणि आज दुसऱ्याचं दिवशी सोने देखील 50 हजारांच्या पुढे गेले आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रकरणामुळे जगभरात मंदीचे सावट आहे. अशात सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे. त्यामुळे जागतिक बाजारात सोन्याच्या किंमतीने आठ वर्षांच्या विक्रमी पातळीच्या आसपास जाण्याची किमया केली आहे. जगभरात कोरोना व्हायरसच्या वाढत्या केसेसमुळे या पिवळ्या धातूमध्ये गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. सध्याच्या असुरक्षित वातावरणात ही सुरक्षित गुंतवणूक असल्याने लोकांचा सोन्याकडे कल दिसत आहे. याबाबत बोलताना मुंबई ज्वेलर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष कुमार जैन म्हणाले की ही वाढ होणं अपेक्षित होतं. यामध्ये दसऱ्यापर्यंत आणखी वाढ होईल त्यावेळी सोन्याचे दर प्रतितोळा 55 ते 56 हजारांच्या आसपास असू शकतील. सध्या सोन्याचा अंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार करता सोनं 1700 ते 1800 डॉलरला पार करून पूढे गेले आहे. लॉकडाऊनच्या आधी सोनं 1250 च्या आसपास होतं. परंतू आता लॉकडाऊनचा परिणाम सोन्यावर जाणवू लागला आहे. भारतीय बाजाराचा विचार करता सोनं 38 हजार ते 40 हजाराच्या आसपास होते. परंतु आजअखेर  त्यात 10 हजार रुपयांपर्यंत वध झाली आहे. ही वाढ होण्यामागे सध्या देशात आलेली कोरोना व्हायरसची महामारी प्रमुख कारण आहे. यामध्ये लाखों लोकांचा मृत्यू झाला आहे. ज्याचा थेट परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे. अशीच परिस्थिती राहिली तर सोन्याच्या दरात पुढील काही दिवसांत आणखी मोठ्या प्रमाणात वाढ होईल. सध्या देशात सोन्याची आयात कमी प्रमाणात झाली आहे. यासोबतच़ जगभरात सोन्याच्या ज्या खाणी आहेत. तिथं कोरोना व्हायरसचा फटका बसल्यामुळे कामगार कमी आहे. या सर्व बाबींचा परिणाम सोन्याचे दर वाढण्यास कारणीभूत ठरले आहेत.

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

JIO IPO: जगभरातील दिग्गज फंड्स जिओच्या आयपीओमध्ये पैसे गुंतवण्यास उत्सुक, GIC, ब्लॅकरॉक आणि ADIA रांगेत
जगभरातील दिग्गज फंड्स जिओच्या आयपीओमध्ये पैसे गुंतवण्यास उत्सुक, GIC, ब्लॅकरॉक आणि ADIA रांगेत
Mhada Pune Lottery : म्हाडाच्या पुणे मंडळाकडून 4462 घरांच्या लॉटरीसाठी मुदतवाढ पण महाआयटीच्या सेवा बंद असल्यानं अर्जदार हवालदिल, पुन्हा मुदतवाढ मिळणार?
म्हाडाच्या पुणे मंडळाकडून लॉटरीसाठी मुदतवाढ, महा आयटी सेवा डाऊन असल्यानं डोमिसाईल आणि उत्पन्नाच्या दाखल्यांची मंजुरी रखडली, अर्जदार चिंतेत
RBI : बँकिंग क्षेत्रात मोठ्या घडामोडी सुरु,दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
Donald Trump : रशियासोबत डिझेल खरेदीची डील करताच ट्रम्प यांचा यूटर्न, भारत आणि चीनवरील 100 टक्के टॅरिफचं संकट टळलं, अमेरिकेचा मोठा निर्णय
भारत आणि चीनवरील 100 टक्के टॅरिफचं संकट टळलं, डोनाल्ड ट्रम्प यांचा यूटर्न, अमेरिकेचा मोठा निर्णय 

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा थेट व्हिडिओ व्हायरल
कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा व्हिडिओ व्हायरल
लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती; कुटुंबीयांकडून CM फडणवीसांचे आभार
लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती; कुटुंबीयांकडून CM फडणवीसांचे आभार
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीला फोनवर धमकी,
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीला फोनवर धमकी, "तुझा नेक्स्ट गेम" म्हणत पाठवला मेसेज, कुटुंबीय भीतीच्या छायेत
UP News : एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
सांत्वनाला आलेल्या प्रताप सरनाईकांसमोर पूर्णेकर कुटुंबाने आक्रोश मांडला; म्हणाले, मीनाक्षी शिंदेला तात्काळ हटवा
सांत्वनाला आलेल्या प्रताप सरनाईकांसमोर पूर्णेकर कुटुंबाने आक्रोश मांडला; म्हणाले, मीनाक्षी शिंदेला तात्काळ हटवा
Ind Vs WI 5th T20 : सलग 4 मॅच बेंचवर बसवलं, वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटच्या समान्याआधी वैभव सूर्यवंशीची फक्त 2 शब्दांची पोस्ट, नेमकं काय म्हणाला?
सलग 4 मॅच बेंचवर बसवलं, वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटच्या समान्याआधी वैभव सूर्यवंशीची फक्त 2 शब्दांची पोस्ट, नेमकं काय म्हणाला?
Mhada Pune Lottery : म्हाडाच्या पुणे मंडळाकडून 4462 घरांच्या लॉटरीसाठी मुदतवाढ पण महाआयटीच्या सेवा बंद असल्यानं अर्जदार हवालदिल, पुन्हा मुदतवाढ मिळणार?
म्हाडाच्या पुणे मंडळाकडून लॉटरीसाठी मुदतवाढ, महा आयटी सेवा डाऊन असल्यानं डोमिसाईल आणि उत्पन्नाच्या दाखल्यांची मंजुरी रखडली, अर्जदार चिंतेत
मंत्र्यांचा कार्यक्रम, पोलिसांच्या हातावर तुरी; नागरिकांनी पकडलेल्या चोरट्याने डोळ्यादेखत धूम ठोकली
मंत्र्यांचा कार्यक्रम, पोलिसांच्या हातावर तुरी; नागरिकांनी पकडलेल्या चोरट्याने डोळ्यादेखत धूम ठोकली
Embed widget