एक्स्प्लोर

केवळ 5 दिवसात सोन्याच्या किमतीत तब्बल 3500 रुपयांची पडझड; कारणं काय? आज 10 ग्रॅममागे किती पैसे मोजावे लागतील?

Gold Prices: गेल्या आठवड्यात सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली. सोन्याच्या किमतीत 3.5 टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. तर चांदीच्या किमतीत 1 टक्क्यांपर्यंत घट झाली आहे.

Gold Prices India: एप्रिल महिन्याच्या शेवटी लाखांचा टप्पा ओलांडलेल्या सोन्याचांदीच्या भावात गेल्या दोन आठवड्यांपासून मोठे चढउतार होत आहेत. आधी भारत पाकिस्तान युद्धामुळे सोन्याचे वर गेलेले भाव युद्धबंदीच्या शक्यतेने घसरले. युद्ध संपते ना संपते तोच अमेरिकी व्यापारी धोरणाचाही सोन्याच्या दरांवर मोठा परिणाम झाल्याचे दिसले. लाखाहून अधिक गेलेल्या सोन्याच्या किमतीत 12 ते 16 मे दरम्यान मोठी पडझड झाल्याचे दिसले. 24 कॅरेट 100 ग्रॅम सोन्याच्या किमतीत तब्बल 35,500 रुपयांची तर 10 ग्रॅम सोन्याच्या किमतीत 3500 रुपयांची घसरण झालीय. अमेरिकेच्या टॅरिफ धोरणानं देशांतर्गत सोन्याच्या किमतींमध्ये मोठी पडझड झाली. शनिवारी सोन्याच्या किमतींमध्ये फारशी तफावत नव्हती. रविवारी 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव 92700 रुपये असून चांदी किलोमागे  95310 रुपयांवर गेलीय. पुढील ट्रेडिंग सत्रात, सोने 88,000- 95000 रुपयांवर राहण्याची शक्यता आहे. तर चांदी 91000-98000पेक्षा अधिक राहू शकतात. (Gold Silver Prices)

सोन्याचे भाव का घसरले?

गुड रिर्टन्सच्या अहवालानुसार, गेल्या आठवड्यात सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली. सोन्याच्या किमतीत 3.5 टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. तर चांदीच्या किमतीत 1 टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. जागतिक व्यापार तणाव कमी झाल्यामुळे आणि गुंतवणूकदारांमध्ये सोने-चांदी खरेदीबाबत सकारात्मक परिस्थिती निर्माण झाल्यामुळे सोने खरेदीदारांचा ओढा सुरक्षित गुंतवणुकीवर आल्याचंही सांगितलं जात आहे. मात्र, अजूनही अनेकांना सोन्याचे भाव आणखी खाली येण्याची शक्यता वाटत असल्याने साशंकता कायम आहे.

अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्धात 90 दिवसांचा ब्रेक लागल्याने सोन्याच्या किमती घसरल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. दोन्ही देशांमधील या करारात अमेरिकेने चिनी वस्तूंवरील शुल्क 145 टक्क्यांवरून 30 टक्क्यांवर आणले आहे.तर चीनने अमेरिकन आयातीवरील कर 125 टक्क्यांवरून 10 टक्के केला आहे. हे पाऊल व्यापार युद्ध कमी करण्यासाठी दोन्ही देशांमधल्या कराराचे प्रतिबिंब असल्याचं सांगितलं जातंय. यापूर्वी भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदी करारामुळेही सोन्याच्या किमतीत घसरण झाली होती. मात्र, रशिया आणि युक्रेनमधील शांतता चर्चेवर अजूनही प्रश्नचिन्ह आहे. 

देशातील सोन्याचा भाव

 17 रोजी देशात 24 कॅरेट सोन्याच्या 100 ग्रॅमची किंमत 9,51,300 रुपये होती. 18 कॅरेट सोन्याच्या त्याच संख्येच्या ग्रॅमची किंमत 7,13,500 रुपये होती आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 8,72,000 रुपये होती. त्याचप्रमाणे 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 95130  रुपये नोंदली गेली. 

17  मे रोजी 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 87200 रुपये होती आणि 18 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 71350 रुपये होती. 18 मे रोजीही सोन्याच्या किमतीत कोणताही बदल होण्याची शक्यता नाही. 

किती घसरण झाली आहे? 

12 मे रोजी 24 कॅरेट सोन्याच्या 100 ग्रॅमच्या किमतीत 32200 रुपयांची घसरण झाली होती, 

14 मे रोजी 5400 रुपयांची घसरण झाली होती आणि 15 मे रोजी 21300 रुपयांची घसरण झाली होती. 

13 मे आणि 16 मे रोजी 100 ग्रॅम सोन्याच्या किमतीत 11400 रुपये आणि 12000 रुपयांची वाढ झाली.

एकूणच या आठवड्यात मे 2025 मधील सर्वाधिक विक्री देखील झाली. त्यानुसार, 12 मे ते 16 मे या कालावधीत 100 ग्रॅम सोन्याच्या किमतीत 35500  रुपयांची आणि 24 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याच्या किमतीत 3550 रुपयांची घट झाली. एकूणच, मे महिन्यात सर्व कॅरेटच्या सोन्याच्या किमती 1 टक्क्यांनी घसरल्या आहेत. 

सोन्याचे नवीनतम भाव

मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 92700 रुपये, 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 8497 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 69525 रुपये आहे.

सध्या देशात 1 किलो चांदीची किंमत 95310 रुपये आहे. तर 10 ग्रॅम आणि 100ग्रॅम चांदीची किंमत अनुक्रमे 953 रुपये आणि 9530 रुपये आहे.  

हेही वाचा:

 Gold Price:  अमेरिका-चीनमुळं सोन्याचे दर घसरले, 10 ग्रॅम सोनं 85 हजारावर येणार का? जाणून घ्या 

 

Input By : ु

महत्त्वाच्या बातम्या

NSE च्या ऑप्शन्स व्यवहारांना पुन्हा गती मिळण्याची शक्यता; 7 डिसेंबरपासून CAS चे सुधारित नियम लागू
NSE च्या ऑप्शन्स व्यवहारांना पुन्हा गती मिळण्याची शक्यता; 7 डिसेंबरपासून CAS चे सुधारित नियम लागू
Old Monk Rum Latest Marathi News: 5 महिन्यांपासून बंदी असलेल्या Old Monk च्या विक्रीचा मार्ग खुला, पण नेमकं काय बदलणार?; पाहा A टू Z माहिती
5 महिन्यांपासून बंदी असलेल्या Old Monk च्या विक्रीचा मार्ग खुला, पण नेमकं काय बदलणार?; पाहा A टू Z माहिती
क्रेडिट कार्डवरील नो-कॉस्ट ईएमआय पूर्णपणे मोफत नाहीच, प्रोसेसिंग फी आणि 18 टक्के जीएसटीमुळे अतिरिक्त भार; खरेदी करण्यापूर्वी या 5 गोष्टी तपासा!
क्रेडिट कार्डवरील नो-कॉस्ट ईएमआय पूर्णपणे मोफत नाहीच, प्रोसेसिंग फी आणि 18 टक्के जीएसटीमुळे अतिरिक्त भार; खरेदी करण्यापूर्वी या 5 गोष्टी तपासा!
Gold Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 24 टक्क्यांनी तर भारतात 20 टक्क्यांनी कोसळले, फरक नेमका कशामुळं? भारतात सोनं उच्चांकावरुन 36700 रुपयांनी घसरलं
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 24 टक्क्यांनी कोसळले, भारतात सोनं 20 टक्क्यांनी स्वस्त, फरक कशामुळं? 

व्हिडीओ

Gokul Chairman Election 2026: गोकुळमध्ये शासननियुक्त 4 संचालक पोहोचले तेव्हा...काय घडलं?, VIDEO
Vivekanand Patil Gokul Morcha Speech : कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण
Varsha Usgaonkar Majha Katta: कॉलेजचे किस्से ते सिनेमातील प्रवास,वर्षा उसगांवकरांसोबत दिलखुलास गप्पा
Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
UP Car Accident: दिवाळीसाठी निघाले, एक चूक आणि सगळे जिवंत जळाले; कार अपघातामध्ये 6 मित्रांचा मृत्यू, संपूर्ण गाव सुन्न!
दिवाळीसाठी निघाले, एक चूक आणि सगळे जिवंत जळाले; कार अपघातामध्ये 6 मित्रांचा मृत्यू, संपूर्ण गाव सुन्न!
Ajit Pawar family Visit Memorial: दिवाळी पाडव्याला सुनेत्रा वहिनी मुलं-सुनांसोबत अजितदादांच्या स्मृतीस्थळावर पोहोचल्या; कायनात दारा, ऋतुजा पवारांनी वाहिली श्रद्धांजली, दादांच्या बहिणीला अश्रू अनावर
सुनेत्रा वहिनी मुलं-सुनांसोबत अजितदादांच्या स्मृतीस्थळावर पोहोचल्या; कायनात दारा, ऋतुजा पवारांनी वाहिली श्रद्धांजली, दादांच्या बहिणीला अश्रू अनावर
Gokul Chairman Election Mahayuti: गोकुळच्या अध्यक्षपदाची वाटणी होणार, महायुतीचा संभाव्य फॉर्म्युला समोर; कोणत्या पक्षाचा पहिला अध्यक्ष होणार?
गोकुळच्या अध्यक्षपदाची वाटणी होणार, महायुतीचा संभाव्य फॉर्म्युला समोर; कोणत्या पक्षाचा पहिला अध्यक्ष होणार?
Gokul Chairman Election 2026: गोकुळ दूध संघावरील शासननियुक्त 4 संचालकांची नावं समोर; सरकारने कुणाकुणाची निवड केली?, पाहा यादी!
गोकुळ दूध संघावरील शासननियुक्त 4 संचालकांची नावं समोर; सरकारने कुणाकुणाची निवड केली?, पाहा यादी!
Modi Zelenskyy Phone Call : रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
मोठी बातमी : अजित पवारांच्या घातपातप्रकरणी सुनील तटकरेंची चौकशी करा, तो राक्षसी माणूस, अंतुलेंनाही त्यांनीच संपवलं : रामदास कदम
अजित पवारांच्या घातपातप्रकरणी सुनील तटकरेंची चौकशी करा, तो राक्षसी माणूस, अंतुलेंनाही त्यांनीच संपवलं : रामदास कदम
Satej Patil : मातंग समाजाचे मिणचेकर पडले, मराठ्यांचे युवराज पाटील पडले, पण मुश्रीफांना फक्त त्यांचा मुलगा पडल्याचं दुःख, मग खरे जातीयवादी कोण? सतेज पाटलांचा सवाल
Satej Patil : मातंग समाजाचे मिणचेकर पडले, मराठ्यांचे युवराज पाटील पडले, पण मुश्रीफांना फक्त त्यांचा मुलगा पडल्याचं दुःख, मग खरे जातीयवादी कोण? सतेज पाटलांचा सवाल
Satej Patil Gokul Chairman Election 2026: सरकारने गुलदस्त्यात ठेवलेली 4 नावं सतेज पाटलांनी कशी शोधून काढली? GR साईटवर अपलोड नसतानाही सिक्रेट माहिती लीक
सरकारने गुलदस्त्यात ठेवलेली 4 नावं सतेज पाटलांनी कशी शोधून काढली? GR साईटवर अपलोड नसतानाही सिक्रेट माहिती लीक
Embed widget