One Country One Gold Rate : सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी.... वन नेशन, वन गोल्ड रेट योजनेमुळे देशभरात एकाच दरात सोने मिळणार आहे. सध्या तामिळनाडूपासून जम्मू-काश्मीरपर्यंत सोन्याचा दर वेगवेगळा असतो.  मात्र, सोने ज्या बंदरावर आयात होऊन उतरवले जाते तेथून ते देशातील वेगवेगळ्या राज्यात पाठवलं जातं. वाहतुकीचा खर्च जोडल्यानंतर प्रत्येक राज्यातील सोन्याचा भाव वेगळा होतो. ही परिस्थिती बुलियन एक्स्चेंजमुळे बदलणार आहे. बुलियन एक्सचेंजच्या श्रेणीतील ज्वेलर्स आंतरराष्ट्रीय दराने सोने खरेदी करू शकतील. यांत वाहतुकीचा खर्च वाचेल. त्यामुळे सोन्याचा दर कमी ठेवण्यातही मदत मिळेल.


बुलियन एक्सचेंज (IIBX) म्हणजे काय?


बुलियन एक्सचेंज (IIBX) म्हणजे काय आणि हे कसं काम करतं जाणून घ्या. भारतीय बुलियन एक्सचेंज (India International Bullion Exchange) शेअर बाजाराप्रमाणे बाजार असेल. येथे सोन्याची खरेदी-विक्री होईल. बुलियन एक्सचेंज मधील बुलियनचा अर्थ बिस्किट किंवा नाण्यांच्या स्वरुपात असलेलं उच्च गुणवत्तेची सोने किंवा चांदी आणि एक्सचेंज म्हणजे देवाणघेवाण. त्यामुळे बुलियन एक्सचेंजचा अर्थ सोन्या-चांदीची देवाणघेवाण असा आहे. 


या आधी फक्त काही बँका किंवा केंद्रीय बँकांकडून मंजुरी मिळालेल्या संस्थांना देशात सोने किंवा चांदीची आयात करण्याची परवानगी होती. पण आता बुलियन एक्सचेंजवर ग्राहक सोने खरेदी करु शकती. यामुळे सोन्याची आयात पारदर्शी होईल. बुलियन एक्स्चेंजमुळे सोन्याचे दर कमी करण्यात मदत होईल. याशिवाय देशभरात सोने आणि चांदीसाठी एकच दर लागू होईल.


पाहा व्हिडीओ : एक देश, एक दर! देशभरात एकाच दरात सोने विक्री


 



 


पहिल्या भारतीय बुलियन एक्सचेंज गुजरातमध्ये आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते भारतीय बुलियन एक्सचेंजचं उदघाटन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं आहे. बुलियन एक्सचेंजमुळे भारतात आयात केलेल्या सोन्याची खरेदी आणि विक्री प्रक्रिया सोपी होईल. यामुळे देशासह जागतिक बाजारातही सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक करणं शक्य होईल. भारतीय बुलियन एक्सचेंजवर (IIBX) आतापर्यंत 64 सराफ व्यापारी जोडले गेले आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या


India's 1st international bullion exchange : देशातील पहिले आंतरराष्ट्रीय बुलियन एक्स्चेंज सुरू, सोने आयात करणे सोपे होणार