Dia Mirza : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दिया मिर्झानं (Dia Mirza) काल (01जुलै) सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये तिनं तिच्या भाचीच्या निधनाची माहिती दिली आहे. दिया मिर्झाची भाची तान्या काकडेचं निधन झालं आहे. तान्यानं 21 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. रिपोर्टनुसार, एका कार अपघातामध्ये तान्याचं निधन झालं. दियानं सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
दिया मिर्झानं शेअर केली भावनिक पोस्ट
दियानं तान्याचा फोटो शेअर करुन पोस्टमध्ये लिहिलं, 'माझी भाची, माझा जीव, माझं बाळ हे जग सोडून गेलं आहे. तुला जिथे असशील तिथे तुला शांती मिळो, ओम शांती'. सुनील शेट्टी, गौरव कपूर, ईशा गुप्ता, सिद्धांत चतुर्वेदी, रिद्धिमा कपूर साहनी, अर्जुन रामपाल, बोमन ईरानी या सेलिब्रिटींनी दियाच्या पोस्टवर कमेंट करुन तान्याला श्रद्धांजली वाहिली आहे. तान्या ही मेक-अप आर्टिस्ट होती. ती अनेक वेळा दियाच्या रेड कार्पेट लूकचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत होती.
दिया मिर्झाचे चित्रपट
रहना है तेरे दिल या चित्रपटामधून दियानं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. 2000 मध्ये दियानं मिस इंडिया अशिया पॅसिफिकचा किताब पटकवला. दीवानापन, तुमको न भूल पाएंगे, परिणिता, मुन्ना भाई, क्रेजी 4 या चित्रपटांमध्ये दियानं काम केलं आहे.
हेही वाचा: