Vinayak Raut : शिवसेना बंडखोर आमदारांनी आपल्या कार्यालयात माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा फोटो आता काढून टाकण्यास सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या जागी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो लावण्यात येत आहे. याची सुरवात औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांच्यापासून झाली आहे.  या प्रकारानंतर आता शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी कडाडून हल्ला चढवला आहे. कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या राऊत यांनी गद्दार आमदारांच्या कार्यालयात उद्धव आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो नकोतच, अशा शब्दात हल्ला चढवला. अशा आमदारांमध्ये  उद्धव साहेब आणि आदित्य ठाकरे यांना अडकावयाचे नाहीच, असे राऊत म्हणाले. 

Continues below advertisement

म्हणून शिवसेना फोडायचे ठरवले विनायक राऊत यांनी बंडखोरांचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले की, मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे आव्हान वाटू लागल्याने त्यांनी शिवसेना फोडल्याचा आरोपही विनायक राऊत यांनी केला. आमदार शहाजी  बापू पाटील यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिले. शहाजी बापू म्हणजे नौटंकी आमदार आहे, त्यांची ही शेवटची आमदारकी असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.  

भाजप विरोधात प्रादेशिक पक्षांनी एकत्र येण्याची गरज 

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी शिवसेनेचा अंत जवळ आला आहे असे वक्तव्य केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर कडाडून हल्ला चढवला होता. भाजपचा वंश तपासण्याची वेळ आल्याचे त्यांनी म्हटले होते. या पार्श्वभूमीवर विनायक राऊत यांनी भाजप विरोधात प्रादेशिक पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे मत व्यक्त ठोकले. 

Continues below advertisement

आमदार संजय शिरसाट उद्धव ठाकरेंचा फोटो काढल्यानंतर म्हणतात..

माझ्या कार्यालयात मी जास्त फोटो लावत नाही. आदित्य ठाकरे यांचा फोटो सुद्धा माझ्या कार्यलयात नव्हता.मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत काम करत असल्याने त्यांचा फोटो असणे आवश्यक आहे. तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांचा फोटो माझ्या कार्यालयात असून, तो आयुष्यभर कधीही हलणार नाही. दिघे साहेब यांना आम्ही मानतो त्यामुळे त्यांचा फोटो आहे. तसेच जे लोकं रोजच आम्हाला गद्दार, बंडखोर म्हणतात त्यांचे फोटो कसे लावणार?, ज्या दिवशी ते आम्हाला चांगले म्हणतील त्या दिवशी त्यांचा सुद्धा फोटो लावू असे शिरसाट म्हणाले.