मुंबई : जागतिक पातळीवर घडत असलेल्या घडामोडी आणि राज्यातील लोकसभा निवडणूक यामुळे भारतीय शेअर बाजारात (Share Market) सध्या चढ-उतार पाहायला मिळतोय. अशीच स्थिती सध्या सोने आणि चांदी यांच्या दरातही (Gold And Silver Rate) पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर चीनसारख्या देशाकडून सोन्याच मोठ्या प्रमाणात साठा केला जातोय. भारतानेही सोने खरेदीला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांत सोन्याच्या दरात सातत्याने वाढ झाली. दरम्यान, सोने-चांदी यांच्या दरात वाढ होत असताना आता गेल्या चार दिवसांत सामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. चार दिवसांत सोन्याच्या दरात अडीच हजार रुपयांनी घट झाली आहे. परिणामी सोने 74300 प्रति दहा ग्रॅमवर आले आहे. परिणामी आता ग्राहकांना काहीसा दिलासा मिळालाय. 


सुरक्षित गुंतवणूक म्हणून गुंतवणूकदरांचा सोनेखरेदीकडे कल


सोन्याच्या दरात मागील महिन्यात सातत्याने वाढ होत झाली होती. परिणामी त्याचा दर विक्रमी पातळीवर पोहोचला होता. जागतिक पातळीवर युद्धजन्य परिस्तिथीचा परिणाम म्हणून गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याच्या गुंतवणुकीकडे आपला मोर्चा वळविला होता. सोन्याचे दर हे दिवसागानिक वाढत होते. त्यामुळे भविष्यातही अशीच स्थिती राहील असा अंदाज गुंतवणूकदारांनी बांधला होता. 


चार दिवसांत सोन्यात 2500 रुपयांची घट 


मात्र गेल्या चार दिवसात सोन्याच्या दरात 2500 रुपयांची घसरण झाली आहे. जागतिक पातळीवर युद्ध जन्य परिस्थिती काहीशी सावरली असल्याने त्याचा परिणआम सोन्याच्या दरावर झाला आहे. तसे सोने व्यावसायिकांचे मत आहे. याबाबत रतनलाल बाफना ज्वेलर्स संचालक सुशील बाफना यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जळगाव या सुवर्णनगरीत आज सोन्याचा दर जीएसटीसह 74300 रुपयांपर्यंत आला आहे. मागील चार दिवसांपूर्वी हा दर 76800 इतक्या विक्रमी पातळीवर गेला होता, असे बाफना यांनी सांगितले. 


ग्राहकांची वेट अँड वॉचची भूमिका


दरम्यान, सोन्याचे दर कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला असला तरी अजूनही सोन्याचे दर कमी होतील ग्राहकांना अपेक्षा आहे. त्यामुळे अनेक ग्राहकांनी अजूनही वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. 


हेही वाचा :


म्यूच्यूअल फंडातले 'हे' पाच स्मॉलकॅप फंड तुम्हाला करणार मालामाल; एका वर्षात दिले तब्बल 60 टक्के रिटर्न्स


कोलकाता जिंकली, पण IPL मधून शाहरुखला किती प्रॉफिट होतो? जाणून घ्या कमाईचं गणित


50 लाखांचं घर घ्या, तेही फुकटात! 'हा' फॉर्म्यूला वापरल्यास सगळे पैसे परत मिळणार; जाणून घ्या सविस्तर!