मुंबई : आपत्कालीन स्थितीत किंवा अन्य मार्ग बंद झाल्यानंतर आपण वेगवेगळ्या बँकांकडून वैयक्तिक कर्ज घेतो. अशा प्रकारच्या कर्जावर बँका कोणतेही तारण घेत नाहीत. म्हणूनच या कर्जावर मोठा व्याजदर आकारला जातो. पर्सनल लोन देताना बँका समोरच्या व्यक्तीचा सीबील स्कोअर चेक करतात. सीबील स्कोअर चांगला अशेल तरच बँका पर्सनल लोन दातात. अन्यथा कर्जाचा अर्ज फेटाळला जातो. दरम्यान, बँका सीबील स्कोअरसह अन्य तीन गोष्टीही तपासतात.  मुळात या तीन गोष्टी वेगवेगळे रेश्यो असतात. या तीन गोष्टी नेमक्या काय आहेत हे जाणून घेऊ या.


1- Debt-to-Income (DTI) Ratio


पर्सनल लोन देताना बँका सीबील स्कोअरसह टेट टू इन्कम रेशो तपासतात. तुमचा मासिक पगार आणि तुमचे डेट पेमेंट याच्या आधारे हा रे रेश्यो काढला जातो. डीटीआय रेश्यो जेवढा कमी तेवढी कर्ज मिळण्याची शक्यता वाढते. म्हणजेच डीटीआय रेश्यो कमीत कमी असणे गरजेचे अशते. या रेश्योच्या मदतीने तुच्यामवर अगोदर किती कर्ज आहे, कर्जाचे हफ्ते गेल्यानंतर तुमच्या हातात किती रुपये शिल्लक राहतात, याची माहिती बँकाने या रेश्योच्या मदतीने मिळते.


2- EMI/NMI Ratio


EMI/NMI या रेश्याच्या मदतीने तुमचा सध्या चालू असलेला इएमआय तसेच प्रस्तावित कर्जाच्या ईएमआयवर तुमचे एकूण किती रुपये खर्च होतील, याची माहिती मिळते. तुमचा EMI/NMI रेश्यो 50-55 टक्क्यांपर्यंत असेल तर ठीक आहे, असे मानले जाते. मात्र हा रेश्यो 50-55 टक्क्यांपेक्षा अधिक असेल तर बँका तुम्हाला कर्ज देण्याचे टाळतात. विशेष म्हणजे हा रेश्यो 50-55 टक्क्यांपेक्षा अधिक असेल तर बँका कर्जावर अधिक व्याज आकारतात.


3- Loan-to-Value Ratio (LTV)


गृहकर्ज देताना या प्रकारच्या रेश्योचा विचार केला जातो. तुम्ही घेत असलेले कर्ज आणि कोलॅटरल यांचे मूल्य काय आहे, याचा अभ्यास या रेश्योच्या मदतीने केला जातो. या रेश्योच्या मदतीनेच बँका तुम्हाला कर्ज देताना नियम, अटी तयार करतात. 


सीबील स्कोअरचं महत्त्व काय?  


एखाद्या व्यक्तीला कर्ज देण्यासाठी बँका सीबील स्कोअरचाही प्राधान्याने विचार करतात. तुमचा सीबील स्कोअर जेवढा जास्त तुम्हाला कर्ज मिळण्याची शक्यताही तेवढीच जास्त असते. तुमचे जुने कर्ज, क्रेडिट कार्डचे बील आदींच्या मदतीने तुमचा सीबील स्कोअर तपासला जातो. तुम्ही तुमचे कर्ज, क्रेडिट कार्डचे बील वेळेवर देत अशाल तर तुमचा सीबील स्कोअर चांगला असो. अन्यथा हा स्कोअर कमी होतो आणि तुम्हाला कर्ज मिळण्याची शक्यता कमी होते. 


हेही वाचा :


कोलकाता जिंकली, पण IPL मधून शाहरुखला किती प्रॉफिट होतो? जाणून घ्या कमाईचं गणित


महागड्या गाड्या, आलिशान घर! कोलकाताला IPLची ट्रॉफी मिळवून देणारा, श्रेयस अय्यर किती कोटींचा मालक?


ट्रॅफिक ते गॅस सिलिंडर, येत्या जून महिन्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे नियम; जाणून घ्या अन्यथा खिशाला लागेल कात्री!