म्यूच्यूअल फंडातले 'हे' पाच स्मॉलकॅप फंड तुम्हाला करणार मालामाल; एका वर्षात दिले तब्बल 60 टक्के रिटर्न्स
Top-5 Small Cap Funds: शेअरखान या ब्रोकरेज फर्मने 5 सर्वोत्तम स्मॉलकॅप फंड्स सूचवले आहेत. या फंड्समध्ये एसआयपी करता येईल, असे शेअरखानने म्हटले आहे. शेअरखानने सूचवलेल्या या फंडांनी एका वर्षात 60 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयातील पहिल्या फंडाचे नाव Nippon India Small Cap Fund असे आहे. या फंडाची साईझ 50422 कोटी रुपये आहे. या फंडात एकरकमी गुंतवणूक करणाऱ्यांना एका वर्षात 60 टक्के तर SIP च्या माध्यमातून गुंतवणूक करणाऱ्यांना 27.4 टक्क्यांनी रिटर्न्स मिळाले आहेत.
या आठवड्यात HDFC Small Cap Fund चा NAV 125.7 रुपयांवर बंद झाला. या फंडाची साईझ 29685 कोटी रुपये आहे. या फंडाने एकरकमी गुंतवणूक करणाऱ्यांना एका वर्षात 44 टक्के तर SIPच्या माध्यमातून गुंतवणूक करणाऱ्यांना 18.23 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत.
या आठवड्यात HSBC Small Cap Fund चा NAV 78 रुपयांवर बंद झाला. या फंडाची साईझ 14620 कोटी रुपये आहे. या फंडाने एकरकमी गुंतवणूक करणाऱ्यांना एका वर्षात 52 ट्के तर SIP करणाऱ्यांना 24.22 टक्क्यांनी रिटर्न्स मिळाले आहेत.
Edelweiss Small Cap Fund या फंडाचा NAV 43 रुपयांवर बंद झाला. या फंडाची साईझ 3361 कोटी रुपये आहे. एकरकमी गुंतवणूक करणाऱ्यांना या फंडाने एका वर्षात 49 टक्के तर SIP करणाऱ्यांना 22 टक्क्यांनी रिटर्न्स मिळाले आहेत.
ICICI Prudential Smallcap Fund या फंडाची साईझ 7658 कोटी रुपये आहे. या फंडाने गेल्या एका वर्षात एकरकमी गुंतवणूक करणाऱ्यांना 46 टक्क्यांनी तर SIP करणाऱ्यांना 22 टक्क्यांनी रिटर्न्स मिळाले आहेत.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)