आजारपणाचं कारण सांगून मोठी वैद्यकीय सुट्टी घेणाऱ्या कर्मचाऱ्यांनी नेमक्या त्याच कारणानं सुट्टी घेतलीय का याचा शोध कंपन्यांकडून घेतला जात आहे. अनेकदा वैद्यकीय रजेचा कालावधी अधिक असल्यानं कंपन्याना अडचणी येत असतात. मात्र, काही कंपन्यांच्या व्यवस्थापकांकडून मार्ग काढण्यात आला आहे. वैद्यकीय रजा घेऊन सुट्टीवर जाणाऱ्यांच्या मागं कंपन्यांनी खासगी गुप्तहेर नेमले जात आहेत. वैद्यकीय रजा घेणारा कर्मचारी खरोखरचं आजारी आहेत की बनाव केला जातोय याचा शोध घेण्याचं काम खासगी गुप्तहेरांकडे आहे. खासगी गुप्तहेरांना आवश्यकता असल्यास रुग्णालय, डॉक्टर आणि स्टाफकडे चौकशी करुन सत्य शोधण्याचा प्रयत्न केला जाईल. 


जर्मनीतील कंपन्यांकडून खासगी गुप्तहेरांकडून सेवा


जर्मनीतील कंपन्यांकडून वैद्यकीय रजा घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या रजेचा कारणाचा शोध घेण्यासाठी खासगी गुप्तहेर एजन्सीजकडून सेवा घेतल्या जात आहेत. यावरुन नैतिकतेच्या मुद्यावर सोशल मीडियावर वादविवाद सुरु आहेत. जर्मन कंपन्यांकडून  कर्मचाऱ्यांकडून खोटं बोलून आवश्यक नसलेली वैद्यकीय रजा घेतल्यानं कंपन्यांच्या उत्पादकतेवर परिणाम झाल्याचं कारण सांगितलं जातं. आर्थिक आव्हानांचा सामना करण्यासाठी जर्मन कंपन्यांकडून खासगी गुप्पतेहरांकडून सेवा घेत वैद्यकीय रजेचा चुकीचा वापर करणाऱ्यांचा शोध घेतला जात आहे.


हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार जमर्मनीतील फ्रँकपुर्ट येथील खासगी गुप्तहेर कंपनी लेंट्ज ग्रुपचे संस्थापक मार्कुस लेंट्ज यांनी सांगितलं की आतापर्यंत 1200  कर्मचाऱ्यांची प्रकरणं हाताळली आहेत. गेल्या काही वर्षात अशा प्रकरणांची संख्या वाढली आहे, असंही ते म्हणाले. 


वैद्यकीय रजेची चौकशी करणारे खासगी गुप्तहेर अजब कारणं सांगत आहेत. काही कर्मचाऱ्यांनी घराची दुरुस्ती करण्यासाठी, काही जणांनी कुटुंबाच्या व्यवसायाचं काम करण्यासाठी वैद्यकीय रजा घेतल्याचं समोर आलं. 


खरंतर वैद्यकीय रजा आजारपणाच्या काळात घेतली जाते. तज्ज्ञांच्यामते वैद्यकीय रजा वाढण्याच्या कारणांचा शोध घेतला पाहिजे. प्रामुख्यानं मानसिक आरोग्याचा मुद्दा देखील पडताळून पाहिला पाहिजे, असं तज्ज्ञ म्हणाले. 


जर्मनीत हा प्रकार सुरु असताना भारतात मात्र एका आठवड्यातील कामाचे तास किती असावेत याबाबत चर्चा जोरदार सुरु आहे. इन्फोसिसचे प्रमुख नारायण मूर्ती यांनी एका आठवड्यात 70 तास काम करायला हवं असं म्हटलं. तर, एल अँड टीचे चेअरमन एसएन सुब्रह्मण्यम यांनी एका आठवड्यात कर्मचाऱ्यांनी 90 तास काम केलं पाहिजे, असं म्हटलं. 


इतर बातम्या :


Ladki Bahin Yojana : नियमात न बसणाऱ्यांनी स्वत:हून नावं काढा,अन्यथा दंडासह वसुली होणार, छगन भुजबळ लाडकी बहीण योजनेबाबत काय म्हणाले?


तब्बल 60 लाख लाडक्या बहिणी बाद ठरणार, राऊतांचा दावा, तुमचंही नाव बाद होणार?