Bhivandi News: भिवंडीतील शांतीनगर भागात राहणाऱ्या 40 वर्षीय फैजान शहा मोहम्मद मोमीन यांनी मुळव्याधाच्या असह्य त्रासामुळे गळफास लावून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.फैजान मागील 18-20 वर्षांपासून रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करत होते. सतत रिक्षा चालवल्यामुळे त्यांना मुळव्याधाचा त्रास सुरू झाला. त्यांनी या त्रासातून सुटका करण्यासाठी अनेक डॉक्टरांकडे उपचार घेतले, परंतु उपचारानंतरही त्रास कायम राहिला. या असह्य वेदनांनी त्रस्त होऊन त्यांनी मुंबई नाशिक महामार्गाच्या किनारी  पिंपळास गावाजवळील एका लोखंडी होल्डिंगला गळफास लावून आत्महत्या केली. (Mumbai News)


घटनेची माहिती मिळताच कोनगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. फैजान शहा मोहम्मद मोमीन यांचा मृतदेह होल्डिंगवरून खाली उतरवून शवविच्छेदनसाठी मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.


नक्की झाले काय?


भिवंडीत राहणाऱ्या रिक्षाचालक फैजान शहा मोहोम्मद गेल्या 20 वर्षांपासून मुंबईत रिक्षा चालवतात. सतत रिक्षा चालवल्याने त्यांना मुळव्याधीचा त्रास सुरु झाला. या त्रासापासून सुटका होण्यासाठी अनेक डॉक्टरांकडे त्यांचे उपचार सुरु होते. अखेर मुळव्याधीच्या असह्य होणाऱ्या वेदना आणि त्रास सहन न झाल्याने रिक्षाचालकाने लोखंडी होल्डिंगला गळफास लाऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच कोनगाव पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून रिक्षाचालकाचा मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. 


लोखंडी सळ्या अंगात शिरल्याने नाशिकमध्ये 6 ठार


नाशिकच्या द्वारका पुलावर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर काही जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातातील मृत आणि जखमींमध्ये प्रामुख्याने किशोरवयीन मुलांचा समावेश आहे. द्वारका पुलावर रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. या अपघातामध्ये एका टेम्पोने  लोखंडी सळ्यांनी भरलेल्या ट्रकला धडकली. या ट्रकमधील लोखंडी सळ्या अंगातून आरपार गेल्याने सहा मुलांचा जागीच मृत्यू झाला. अपघातामुळे द्वारका उड्डाणपुलावरील वाहतूक ठप्प झाली होती. परिणामी नाशिक-मुंबई महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. या परिसरात तब्बल पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. 


हेही वाचा:


Santosh Deshmukh Case: एसआयटीचा प्रमुख अन् दोन बड्या वकिलांची नावं सांगितली, मस्साजोगच्या गावकऱ्यांच्या 5 मागण्या, संक्रातीला टोकाचं पाऊल उचलण्याचा इशारा