बिजिंग : अब्जाधीश मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे आशिया खंडातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्त आहेत. त्यानंतर उद्योगपती गौतम अदाणी यांचंदेखील भारतातील श्रीमंतांच्या यादीत नाव घेतलं जातं. त्यांची संपत्ती ही कित्येक हजार कोटी रुपये आहे. भारतातील अदाणी आणि अंबानी कुंटंबाला जगभरात ओळखलं जातं. मुकेश अंबानी याचं तसेच त्यांच्या कुटुंबाचं राहणीमान पाहून तर अनेकजण थक्क होतात. आपल्या मुलाच्या लग्नात मुकेश अंबानी यांनी तब्बल 5000 कोटी रुपये खर्च केल्याचं म्हटलं जातं. त्यांनी केलेल्या या खर्चावरून त्यांची संपत्ती किती असेल? याचा अंदाज येतो. मात्र इतिहासात गौतम अदाणी, मुकेश अंबानी तसेच टाटा कुटुंबापेक्षाही एक महिला श्रीमंत होती. विशेष म्हणजे या महिलेने कित्येक वर्षे मोठ्या हिमतीनं तिचं राज्य सांभाळलेलं आहे. असं म्हणतात की अंबानी, अदाणी आणि टाटा यांच्यापेक्षा ही महिला हजारपट श्रीमंत होती. 


चीनची एकमात्र महिला स्रमाट


वर उल्लेख केलेल्या महिलेचं नाव वू झेटियान (Wu Zetian) असं आहे. त्या चीनमधील एका राज्याच्या महाराणी होत्या. झेटियान या चीनच्या सर्वांत श्रीमंत महिला होत्या, असं म्हटलं जातं. त्यांची संपत्ती ही 16 ट्रिलियन डॉलर्स होती असं म्हटलं जातं. ते तांग राजवंशातील महाराणी होत्या. त्यांनी चीनमध्ये इसवी सन 690 ते इसवी सन 705 पर्यंत राज्य केलं होतं. त्या चीनच्या पहिल्या आणि एकमात्र महिला सम्राट होत्या. गौतम अदाणी, मुकेश अंबानी आणि रतन टाटा यांची संपत्ती एकत्र केली तरीदेखील ती संपत्ती वू झेटियान यांच्यापेक्षा कमी होते. महाराणी वू झेटियान यांचा 624 इस्वी सन मध्ये चीनमधील शांक्सी प्रांतात झाला होता.


सम्राट आजारी पडल्यानंतर राज्यकारभार सांभाळला


त्यांचे वडील एक लाकूड व्यापारी होती. मात्र लहानपणापासूनच वू झेटियान या इतिशय बुद्धीमान होत्या. 14 व्या वर्षीच त्या तांग दरबारात सचिव झाल्या होत्या. सम्राट तायजोंग यांच्या निधनांतर त्या एका मठात गेल्या होत्या. मात्र सम्राट गौजोंग यांच्यासोबतच्या नात्यामुळे त्यांना परत महालात बोलवण्यात आलं. पुढे सम्राट गौजोंग आजारी पडल्यानंतर त्यांनी राज्याचा कारभार महाराणी वू झेटियान यांच्याकडे सोपवले. त्यानंतर झेटियान यांच्या राज्यकारभाराला सुरुवात झाली. 


15 वर्षे केलं राज्य


महाराणी वू झेटियान या दूरदर्शी, चांगल्या शासक होत्या, असे म्हटले जाते. त्यांनी त्या काळात चीनमध्ये अनेक कल्याणकारी कामे केली होती. मात्र त्यांनी सत्तेसाठी आपल्याच मुलाला मारलं होतं, असं म्हटलं जातं. त्यांनी स्वत:च्या मुलालाच राजगादीवरून हटवलं होतं, असंही म्हटलं जातं. वू झेटियान यांनी 15 वर्षे राज्य केलं होतं. त्या चीनच्या इतिहासातील सर्वात शक्तिशाली आणि सर्वोत्तम शासक म्हणून ओळखल्या जातात.   


हेही वाचा :


दिवळी ते ख्रिसमस, तीन महिन्यांत शेअर बाजार 'या' दिवशी बंद असणार; एक दिवस होणार स्पेशल ट्रेडिंग!


मुकेश अंबानी एका दिवसात किती रुपये कमवतात? त्यांच्यासारखं श्रीमंत व्हायचं म्हटल्यावर लागतील पावणे दोन कोटी वर्षे!