Millionaires Left India: देशभरातील करोडपतींच्या स्टेटस आणि संपत्तीच्या विविध कहाण्या तुम्ही ऐकल्या असतील, परंतु करोडपतींशी संबंधित हा विशेष धक्कादायक अहवाल समोर आला आहे. ज्यामध्ये आत्तापर्यंत 8000 हून अधिक लक्षाधीशांनी भारतात स्थलांतर केल्याची माहिती समोर आली आहे. हेन्ले अँड ग्लोबल यांनी आपल्या अहवालातून गोष्ट लक्षात आणून दिली आहे. 


2022 मध्ये रशिया, चीन आणि भारत (India) या देशातून स्थलांतर होणाऱ्या लोकांची संख्या अधिक आहे असं आकडेवारी सांगते आहे. आत्तापर्यंतच्या आकडेवारीनुसार 3 देशांपैकी 15,000 रशिया, 10,000 चीन आणि 8000 लक्षाधीशांनी स्थलांतर केले आहे. कोवीड-19 च्या दरम्यान स्थलांतर मोठ्या प्रमाणात झालं होतं परंतू त्यानंतर परिस्थिती सुधारल्यानंतर स्थलांतर कमी झालं पण त्यानंतर आता समोर आलेली ही आकडेवारी काही प्रमाणात विचार करायला लावणारी आहे. 


जाणून घ्या अहवालात काय म्हटले आहे


भारतातील लक्षाधीशांच्या स्थलांतरामुळे होणारे नुकसान कमी आहे कारण देशा बाहेर जाणाऱ्या श्रीमंतांपेक्षा अधिक नवीन लक्षाधीश निर्माण होत असल्याचं अहवाल सांगतो आहे. शिवाय श्रीमंत लोक भारतात परतण्याचा आणि एकदा भारतात राहण्याचा ट्रेंड आहे. परंतू अहवालानुसार देशातला राहणीमानाचा स्तर एकदा सुधारला की, श्रीमंत लोक वाढत्या संख्येने परत जातील अशी अपेक्षा आहे. 2031 पर्यंत भारतातील निव्वळ उच्च संपत्ती असलेल्या व्यक्तींची संख्या 80 टक्क्यांनी वाढेल, असा अंदाजही अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.


कोरोनाच्या काळात करोडपती कमी झाले


हाँगकाँग, ब्राझील, मेक्सिको, यूके, सौदी अरेबिया आणि इंडोनेशिया हे असे काही देश आहेत जिथे 2022 मध्ये सर्वाधिक करोडपती बाहेर गेले आहेत. कोरोनाच्या कालावधीबद्दल बोलायचे झाले तर 2020 मध्ये कोविड महामारीमुळे त्यात घट झाली होती, पण 2020 आणि 2021 मध्ये देशांच्या आधारे ट्रॅक करणे कठीण झाले. लॉकडाऊन आणि प्रवासावरील निर्बंधांमुळे हे घडले. युक्रेनमधील युद्धामुळे अनेक करोडपतीही पळून गेले.


या देशांमध्ये करोडपती वाढले आहेत


2022 या वर्षात UAE, इस्रायल, अमेरिका, पोर्तुगाल, कॅनडा, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, ग्रीस आणि स्वित्झर्लंडमध्ये सर्वाधिक करोडपती आले आहेत. गेल्या दोन दशकांमध्ये म्हणजेच 20 वर्षांत 80,000 लक्षाधीशांनी ऑस्ट्रेलियात आपले घर बनवले आहे आणि 2020 मध्ये 3500 लक्षाधीशांनी येथे प्रवेश केला आहे. मुख्यतः आशियातील लक्षाधीश आजकाल सिंगापूरमध्ये मोठ्या प्रमाणात स्थलांतरित होत आहेत. या अंतर्गत, 2022 मध्ये, सुमारे 2800 लक्षाधीश सिंगापूरमध्ये स्थलांतरित होण्याची अपेक्षा आहे.