एक्स्प्लोर

Cryptocurrency : भारतात क्रिप्टोकरन्सीला कायदेशीर मान्यता मिळणार? अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या...

Cryptocurrency In India : भारतात क्रिप्टोकरन्सीला कायदेशीर मान्यता मिळणार का, याबाबत अनेक चर्चा सुरू आहेत.

Cryptocurrency In India : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी क्रिप्टोकरन्सीमधून मिळणाऱ्या  उत्पन्नावर 30 टक्के कर लागू करण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर सरकारने कर लागू करून क्रिप्टोकरन्सीला अप्रत्यक्षपणे मान्यता दिली आहे का, असा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होत आहे. क्रिप्टोकरन्सीच्या कायदेशीर मान्यतेच्या मुद्द्यावर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आता थेट भाष्य केले आहे. 

सरकारने केवळ क्रिप्टोकरन्सी व्यवहारातून झालेल्या नफ्यावर कर लावला आहे आणि त्याला कायदेशीर मान्यता देणे अथवा त्याच्या नियमनाबाबत कोणताही निर्णय घेतला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. क्रिप्टोकरन्सीचे नियमन आणि अधिकृत डिजिटल चलन याबाबत सरकार कायदा तयार करणार असल्याची चर्चा सुरू आहे. अशातच केंद्रीय अर्थसंकल्पात 30 टक्के कर लावण्याची घोषणा करण्यात आली. 

अर्थ सचिवांनी मांडली होती भूमिका

केंद्रीय अर्थसचिव टी. व्ही. सोमनाथम म्हणाले की, बिटकॉईन, इथेरियम किंवा एनएफटी यांना कधीही अधिकृत चलनाचा दर्जा मिळणार नाही. दोन लोकांमधील क्रिप्टोच्या व्यवहारांना क्रिप्टोकरन्सी असेट्स समजले जाईल. तुम्ही सोनं, हिरे किंवा क्रिप्टोची खरेदी करा पण त्याला केंद्र सरकार अधिकृत चलनाची परवानगी देणार नाही. क्रिप्टोकरन्सीमधील गुंतवणूक ही लाभदायक असेल याची खात्री देता येणार नाही असंही अर्थ सचिवांनी स्पष्ट केलं. यामध्ये गुंतवणूक केल्यानंतर जर नुकसान झालं तर त्याला सरकार जबाबदार नसेल असंही ते म्हणाले.

रिझर्व्ह बँकेची भूमिका 

रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी आभासी चलनाबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. आभासी चलन हे मॅक्रो इकॉनॉमिक आणि आर्थिक स्थिरतेसाठी धोका असल्याचे शक्तिकांत दास यांनी म्हटले. रिझर्व्ह बँकेने आपले पतधोरण जाहीर केले. त्यावेळी गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी विविध मुद्यावर भूमिका स्पष्ट केली. शक्तिकांत दास म्हणाले की, क्रिप्टोमुळे आर्थिक स्थिरतेशी मुद्द्यांशी सामना करण्याची आरबीआयची क्षमता कमी होईल. केंद्र सरकारने अर्थसंकल्पात आभासी चलनाच्या नफ्यावर कर लावण्याचा निर्णय घेतल्यानंतर एका आठवड्यानंतर दास यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.  

महत्त्वाच्या बातम्या

Share Market : IT निर्देशांक त्याच्या एक महिन्याच्या उच्चांकावर पोहोचला, जाणून घ्या प्रमुख कारणं
IT निर्देशांक त्याच्या एक महिन्याच्या उच्चांकावर पोहोचला, जाणून घ्या प्रमुख कारणं
RBI Gold Reserve: रिझर्व्ह बँकेकडे सोन्याचा किती साठा? केंद्र सरकारकडून राज्यसभेत आकडेवारी सादर; सोने चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण
रिझर्व्ह बँकेकडे सोन्याचा किती साठा? केंद्र सरकारकडून राज्यसभेत आकडेवारी सादर
Gold Silver Rate: सोन्याची जोरदार मुसंडी, चांदीचे दर 'जैसे थे'; खरेदी करण्यासाठीची योग्य वेळ कोणती? दैनंदिन वापरासाठी किती कॅरेटचे सोने सर्वात टिकाऊ?
सोन्याची जोरदार मुसंडी, चांदीचे दर 'जैसे थे'; खरेदी करण्यासाठीची योग्य वेळ कोणती? दैनंदिन वापरासाठी किती कॅरेटचे सोने सर्वात टिकाऊ?
Virat Kohli Anushka Sharma Buys Luxury Apartment In Mumbai: अलिबागनंतर थेट लंडनला गाठलं अन् आता पुन्हा मुंबईत; अनुष्का-विराटची रिअल इस्टेट मोठी गुंतवणूक, कुठे खरेदी केली कोट्यवधींची प्रॉपर्टी?
अलिबागनंतर थेट लंडनला गाठलं अन् आता पुन्हा मुंबईत; अनुष्का-विराटची रिअल इस्टेट मोठी गुंतवणूक, कुठे खरेदी केली कोट्यवधींची प्रॉपर्टी?

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Rain News :अरबी समुद्रात चक्राकार वारे घोंगावणार, राज्यभरात धुव्वाधार पाऊस बरसणार, 22 जिल्ह्यांना अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?
अरबी समुद्रात चक्राकार वारे घोंगावणार, राज्यभरात धुव्वाधार पाऊस बरसणार, 22 जिल्ह्यांना अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
Chief Minister Wealth : देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
L&T Q1 Results: एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
Embed widget