ITR Filing: आयकर रिटर्न भरणे आणि आयकर भरणे या दोन भिन्न गोष्टी आहेत. आयकर  रिटर्न भरणे म्हणजे आपल्या उत्पन्न-गुंतवणूक आणि खर्चाबाबतची माहिती देणे. ITR भरल्यानंतर जर तुम्हाला कर भरावा लागत असेल तर तो द्यावाच लागतो. 


>> कोणासाठी आवश्यक आहे ITR filing 


- जर तुम्ही भारताचे नागरिक अथवा परदेशात काम करत असलेले भारतीय असाल आणि तुमचे वार्षिक उत्पन्न 2,50,000 रुपयांपेक्षा अधिक असेल तर तुम्हाला ITR भरणे आवश्यक आहे. 


- जर, तुम्हाला नोकरी, व्यवसायातून मिळणारे उत्पन्न हे कर सवलतीपेक्षा अधिक असेल तर तुम्हाला ITR file करणे आवश्यक आहे. 


- एखाद्या आर्थिक वर्षात जर तुमचे एकूण उत्पन्न फक्त कृषी अथवा त्याच्याशी संबंधित कामातून मिळत असेल तर तुम्हाला ITR भरण्याची आवश्यकता आहे. 


- जर तुमचे एकूण वार्षिक उत्पन्न पाच लाखांहून कमी असेल तरी तुम्हाला ITR भरणे आवश्यक नाही. 


>> सर्वांनी ITR file करणे आवश्यक


- सर्वांनीच ITR भरणे आवश्यक आहे. 


- नोकरी अथवा व्यवसायातून एकूण वार्षिक उत्पन्न पाच लाखांहून कमी असेल तरी आयटीआर फाइल करणे आवश्यक आहे. 


- तुमचे उत्पन्न करपात्र नसले तरी तुम्ही ITR भरत असल्याने तुम्ही तुमच्या उत्पन्नाचे ठोस पुरावे जमा करत असता. 


>> ITR भरण्याचे फायदे 


- देशाबाहेर नोकरी करण्यासाठी अर्ज करण्यासाठीदेखील तुमच्याकडे मागील तीन वर्षांचे ITR असणे आवश्यक आहे. त्याशिवाय व्हिसा अर्ज स्वीकारला जात नाही. 


- कर्ज घेण्यासाठी अर्ज करताना बँकर तुमच्या उत्पन्न स्रोताची सत्य माहिती मिळवण्यासाठी ITR कॉपी मागतात. त्याशिवाय, क्रेडिट कार्ड, विमा पॉलिसी आदींबाबत आयकर रिटर्नची मोठी मदत मिळते. तुमच्या उत्पन्नाचा दाखल म्हणून ITR ही महत्त्वाची नोंद असते. 


- टॅक्स रिफंड क्लेम करण्यासाठी आयटीआर फाइल करणे आवश्यक आहे. अनेकदा उत्पन्न कराच्या अखत्यारीत येत नाही. मात्र, तरीदेखील टीडीएस कापला जातो. जर, तुम्हाला टीडीएसमध्ये कापलेला पैसा तुम्हाला रिफंड हवा असेल तर ITR भरणे  आवश्यक आहे. 


संबंधित बातमी: 


stock market : गुंतवणुकदारांची नफा वसुली जोरात; निफ्टी-सेन्सेक्समध्ये घसरण, 'या' क्षेत्राला फटका


T Plus 1 Settlement Cycle : शेअर्स विकल्यानंतर एकाच दिवसात अकाउंटमध्ये पैसे येणार, 25 फेब्रुवारीपासून नवा नियम लागू