Sooryavanshi Box Office: 'सूर्यवंशी' सिनेमा प्रदर्शित होण्याआधीच चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता दिसून येत होती. सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकुळ घातला आहे. सिनेमा 5 नोव्हेंबरला प्रदर्शित झाला होता. गेल्या चार दिवसांत सिनेमाने बक्कळ कमाई केली आहे. हा सिनेमा भारताव्यतिरिक्त सातासमुद्रापारदेखील प्रदर्शित झाला होता. गेल्या चार दिवसांत 'सूर्यवंशी' सिनेमाने 91.59 कोटींची कमाई केली आहे.


अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि कतरिना कैफचा (Katrina Kaif) सूर्यवंशी सिनेमा 5 नोव्हेंबरला जगभर प्रदर्शित झाला होता. या सिनेमाने पहिल्या दिवशी 26.29 कोटी, दुसऱ्या दिवशी 23.85 कोटी, तिसऱ्या दिवशी 26.94 कोटी तर चौथ्या दिवशी 14.51 कोटींची कमाई केली होती. अशापद्धतीने आतापर्यंत सिनेमाने 91.59 कोटींचा गल्ला कमवला आहे. सूर्यवंशी सिनेमाने दिवाळीच्या मुहुर्तावर प्रदर्शित झाला होता.





 अक्षय कुमार आणि कतरिना कैफचा 'सूर्यवंशी' हा चित्रपट देशभरात जवळपास चार हजार पेक्षा जास्त स्क्रीनवर प्रदर्शित झाला आहे. तर जगभरात 5200 स्क्रीनवर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. अक्षय कुमार आणि कतरिना कैफसह अजय देवगन आणि रणवीर सिंह यांचीही सिनेमात विशेष भूमिका आहे. 'सूर्यवंशी' सिनेमात कतरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसून येत आहे. हा एक नाट्यमय सिनेमा आहे. चित्रपटात तिन्ही कलाकार पोलीसाची भूमिका साकारत आहेत. रोहित शेट्टीच्या या चित्रपटात भन्नाट स्टंट पाहायला मिळत आहेत.


Antim Song hone Laga Video:'भाई का बर्थडे' नंतर 'होने लगा' गाणे प्रेक्षकांच्या भेटीला


सूर्यवंशी सिनेमाने प्रदर्शित होण्याआधीच कमवला होता 200 कोटींचा गल्ला


अभिनेता अक्षय कुमारच्या बहुप्रतीक्षित 'सूर्यवंशी' सिनेमाने  प्रदर्शित होण्यापूर्वीच 200 कोटींचा गल्ला जमवला होता. चित्रपटाचे ओटीटी हक्क 200 कोटींना विकले गेले होते.तर म्युझिकचे हक्क विकून 60 कोटींची कमाई करण्यात आली होती. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी 25 कोटींचा खर्च करण्यात आला होता. 


Poonam Pandey In Hospital : अभिनेत्री पूनम पांडे रुग्णालयात, पतीला अटक; मुंबई पोलिसांची माहिती 


Bigg boss 15 : कँडल लाइट डिनर आणि रोमँटिक डान्स; बिग बॉसच्या घरात शमिता-राकेशची परफेक्ट डेट नाइट