Ravi Pradosh Vrat 2024 : सनातन धर्मात प्रदोष व्रत (Pradosh Vrat) अत्यंत फायदेशीर मानले जाते. या दिवशी भगवान शंकराची (Lord Shiva) पूजा केली जाते. या दिवशी जे भगवान शंकर-पार्वतीची भक्तिभावाने पूजा करतात, त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, असे मानले जाते. याशिवाय या तिथीला व्रत पाळल्यास अपत्यप्राप्ती होते अशी देखील मान्यता आहे.
मे महिन्याचा पहिला प्रदोष व्रत 5 मे 2024 रोजी ठेवण्यात येणार आहे. रविवारी येणारे प्रदोष व्रत हे रवि प्रदोष व्रत म्हणून ओळखले जाते, चला तर मग जाणून घेऊयात या व्रताशी संबंधित माहिती.
मे 2024 चा पहिला प्रदोष व्रत
हिंदू कॅलेंडरनुसार, वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी रविवार, 5 मे 2024 रोजी संध्याकाळी 05:41 पासून सुरू होईल. हे व्रत सोमवार, 6 मे 2024 रोजी दुपारी 02:40 पर्यंत चालेल. कॅलेंडर पाहता यावेळी प्रदोष व्रत 5 मे 2024 रोजी पाळले जाणार आहे. याबरोबरच भोलेनाथाचा अभिषेकही याच दिवशी केला जाणार आहे.
प्रदोष व्रत 2024 चे धार्मिक महत्त्व
प्रदोष व्रताला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. या पवित्र दिवशी कडक उपवास करणाऱ्या भाविकांना सुख- समृद्धी लाभते, असे म्हटले जाते. तसेच भगवान शंकराचा आशीर्वाद प्राप्त होतो. काही लोक या विशेष दिवशी भगवान शंकराच्या नटराज रूपाची पूजा करतात.
धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी देवांचा देव महादेवाने तांडव करून अप्सरा राक्षसाचा पराभव केला. भगवान शिवाचे नृत्याविष्ट नटराज नावाने ओळखले जाते, जिच्या उपासनेने अक्षय फळ मिळते.अशी मान्यता आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :