Bank FD News : अलिकडच्या काळात गुंतवणुकीचं (invetsment) महत्व वाढत आहे. भविष्यात येणाऱ्या अडचणींचा सामन्या करण्यासाठी नागरिक विविध योजनांमध्ये पैशांची गुंतवणूक करत आहेत. गुंतवणूक करताना आपल्या पैशांची सुरक्षा आणि ठेवीवर मिळणारा परतावा पाहणं गरजेचं आहे. दरम्यान, FD योजनेवर देखील काही बँका चांगला व्याजदर देतायेत. की बँका FD वर 9 टक्क्यांपर्यंत व्याजदर देतायेत. कोणत्या बँका FD वर चांगले व्याज देतायेत, याबाबतची माहिती पाहुयात. 


ज्या लोकांना कमी जोखीम आवडते,त्यांच्यासाठी FD हा एक चांगला पर्याय आहे. सध्या बँका मुदत ठेवींवर 9 टक्क्यांपर्यंत व्याज देत आहेत. कोणत्या बँका सर्वाधिक व्याज देतायेत त्याबद्दलची माहिती पाहुयात. 


युनिटी स्मॉल फायनान्स बँक 


युनिटी स्मॉल फायनान्स बँक ठेवीवर सर्वाधिक 9 टक्के व्याज देत आहे. ही बँक 1001 दिवसांच्या FD वर 9 टक्के दराने व्याज देत आहे.


सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक


सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक 2 वर्षे आणि 2 दिवसांच्या FD वर 8.65 टक्के दराने वार्षिक व्याज देत आहे.


फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक


फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक 8.61 टक्के दराने FD वर सर्वाधिक व्याज देत आहे. ही ऑफर 750 दिवसांच्या FD साठी आहे.


Equitas Small Finance Bank


Equitas Small Finance Bank 444 दिवसांच्या FD वर 8.50 टक्के व्याज देत आहे. ही बँक 1 वर्षाच्या FD वर 8.20 टक्के आणि 3 वर्षांच्या FD वर 8 टक्के व्याज देत आहे.


जन स्मॉल फायनान्स बँक


जन स्मॉल फायनान्स बँक ज्येष्ठ नागरिकांना 7 दिवस ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी ठेवींवर 3.50 ते 9 टक्के व्याज देते. सर्वाधिक व्याज दर 9 टक्के आहे. जो 365 दिवसात परिपक्व होणाऱ्या FD वर उपलब्ध आहे. बँकेने 2 जानेवारी 2024 पासून हे दर लागू केले आहेत. ज्येष्ठ नागरिक एफडी योजना वृद्धांना त्यांच्या गुंतवणुकीचे संरक्षण आणि वाढ करण्यासाठी उत्तम पर्याय देतात. याद्वारे वृद्धांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यातही मदत होते. दरम्यान, काही काळापासून बँकांकडून एफडीवर चांगले व्याज दिले जात आहे. अलीकडे RBI ने आपल्या धोरण व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे मुदत ठेवी पुन्हा एकदा आकर्षणाचे केंद्र बनल्या आहेत. विविध बँका FD वरील व्याजदरात वाढ करत आहेत, याचा चांगला फायदा ग्राहकांना होत आहे. 


महत्वाच्या बातम्या:


दिलासादायक! HDFC बँकेचा मोठा निर्णय, व्याजदरात केली वाढ; ग्राहकांना होणार मोठा फायदा