मुंबई : राष्ट्रीय महामार्गांवर प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. FASTag Annual Pass आता महाग होणार असून 1 एप्रिल 2026 पासून नव्या दरांची अंमलबजावणी होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून (National Highways Authority of India NHAI) वार्षिक पासच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. 

Continues below advertisement

FASTag Price Hike : टोल पासच्या किमतीत वाढ

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने फास्टॅगच्या किमतीत 75 रुपयांनी वाढ केली आहे. आधी हा पास 3000 रुपयांना मिळायचा. 1 एप्रिल पासून हा पास 3,075 रुपयांना मिळणार आहे. या निर्णयामुळे FASTag Annual Pass ने महाग झाला आहे. नवीन दर 1 एप्रिल 2026 पासून लागू होणार असून लाखो वाहनचालकांवर याचा थेट परिणाम होणार आहे.

FASTag Benefits : काय मिळतं या पासमध्ये?

FASTag Annual Pass हा प्रामुख्यानं खाजगी वाहनांसाठी (कार, जीप, व्हॅन) लागू आहे. 

Continues below advertisement

या पासमध्ये:

1 वर्षाची वैधता किंवा 200 टोल प्रवास (जे आधी पूर्ण होईल) अशी सुविधा मिळते.

यामुळे वारंवार टोल भरण्याची गरज कमी होते आणि प्रवास अधिक सोपा आणि जलद होतो.

How to Buy FASTag : कसा घ्यायचा पास?

हा पास ऑनलाइन सहज उपलब्ध आहे.

‘Rajmarg Yatra’ अ‍ॅप किंवा अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करता येतो.

FASTag ID आणि वाहन क्रमांक टाकावा लागतो.

UPI / कार्ड / नेट बँकिंगद्वारे पेमेंट करता येतं.

पेमेंटनंतर काही तासांत पास अ‍ॅक्टिव्ह होतो.

Reason Behind FASTag Price Hike : दरवाढ का?

या दरवाढीमागे ऑपरेशन आणि देखभाल खर्च वाढ हे मुख्य कारण असल्याचं सांगितलं जात आहे. 

FASTag Pass Price Hike Impact : प्रवास महागणार

FASTag Annual Pass हा अनेक नियमित प्रवाशांसाठी फायदेशीर पर्याय होता. मात्र आता दरवाढीनंतर राष्ट्रीय महामार्गांवरील प्रवासाचा खर्च थोडाफार वाढणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

ही बातमी वाचा: