Swami Samarth Prakat Din 2026: अशक्यही शक्य करतील स्वामी....हिंदू दिनदर्शिकेनुसार, 20 मार्च रोजी स्वामी समर्थांचा प्रकट दिन साजरा करण्यात येतोय. स्वामी भक्तांसाठी एक महत्त्वाचा दिवस आहे, स्वामींचा प्रकट दिन हा दरवर्षी चैत्र शुक्ल द्वितीयेला साजरा केला जातो. या दिवशी महाराष्ट्रातील अक्कलकोटसह ठिकठिकाणी येथे मोठा उत्सव भरतो. देशभरातून लाखो भाविक स्वामींच्या दर्शनासाठी येतात. मंदिरात विशेष पूजन, आरती, भजन-कीर्तन, नामस्मरण आणि पालखी सोहळा आयोजित केला जातो. सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण होते. यानिमित्त भक्तिमय शुभेच्छा पाठवा.
स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होवोत,तुमच्या प्रत्येक प्रयत्नाला यश लाभो, आणि तुमचे आयुष्य सुख, शांती, समाधान, समृद्धीने भरून जावो.“भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे” या त्यांच्या दिव्य वचनाने तुमचे जीवन सदैव उजळून निघो.श्री स्वामी समर्थ!
------------------------------------------------------------------------------------------------
या पवित्र स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त,स्वामींच्या चरणी प्रार्थना की तुमच्या जीवनात आनंदाचे क्षण सतत नांदोत,दुःख, संकटे आणि अडचणी दूर होऊन सुख-समृद्धीचा वर्षाव होवो.स्वामींचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर सदैव राहो आणि जीवनात सकारात्मकता वाढो.श्री स्वामी समर्थ!
-----------------------------------------------------------------------------------------------
स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या मंगलमय शुभेच्छा!स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या जीवनात यश, आरोग्य, आनंद आणि भरभराट लाभो.त्यांच्या नामस्मरणाने तुमचे मन शांत, स्थिर आणि आनंदी राहो.प्रत्येक क्षणी स्वामींचे संरक्षण आणि मार्गदर्शन तुमच्यासोबत असो.श्री स्वामी समर्थ!
-------------------------------------------------------------------------------------------
या शुभ दिनी स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी वंदन करून,तुमच्या जीवनात नवनवीन संधी, आनंद आणि यश येवो अशी प्रार्थना.स्वामींच्या कृपेने सर्व इच्छा पूर्ण होवोत आणि जीवन सुखमय होवो.त्यांची कृपा सदैव तुमच्या पाठीशी राहो.श्री स्वामी समर्थ!
--------------------------------------------------------------------------------------------स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!अक्कलकोट स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस आनंदाचा,प्रत्येक क्षण समाधानाचा आणि प्रत्येक प्रयत्न यशस्वी होवो.संकटांच्या वेळी स्वामींचे नाव तुम्हाला धैर्य देत राहो.श्री स्वामी समर्थ!
ही वाचा>>
Lucky Zodiac Signs: 20 मार्च 5 राशींचं भाग्य घेऊन येतोय! स्वामी समर्थ प्रकट दिनी ग्रहांचे अनेक शक्तिशाली संयोग, स्वामी कृपेने कोणत्या राशींची भरभराट?
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
