Facebook and Instagram  : नुकताच अमेरिकेत गुगल (Google) या दिग्गज कंपनीला लाखो डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला. आता सोशल मीडिया कंपनी फेसबुकलाही (facebook) 53 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. इटलीतील (italy)  कंपनीवर ही कारवाई करण्यात आली. इटलीमध्ये बंदी असलेल्या जुगाराच्या जाहिराती दाखवल्याचा आरोप या कंपनीवर करण्यात आला होता. तसेच इन्स्टाग्रामवही (instagram)  दंड ठोठावण्यात आला आहे. 


फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर जुगाराच्या जाहिराती


इटलीच्या कम्युनिकेशन्स रेग्युलेटर एजीकॉमच्या म्हणण्यानुसार,फेसबुकवर आणि इंस्टाग्रामच्या प्रोफाइल आणि खात्यांद्वारे जुगाराच्या जाहिराती दाखवल्याचा आरोप होता. याशिवाय, कंपनी अशा सामग्रीचा प्रचार करत होती ज्यामध्ये जुगार किंवा गेममध्ये रोख बक्षिसे दिली जात होती. यानंतर, एजीकॉमने शुक्रवारी कंपनीला 5.85 दशलक्ष युरो (6.45 दशलक्ष डॉलर) दंड ठोठावला आहे.


यूट्यूबलाही ठोठावला दंड 


अशा जाहिराती दाखवल्याबद्दल इटलीच्या कम्युनिकेशन्स रेग्युलेटर एजीकॉमने एकामागून एक अनेक कंपन्यांना दंड ठोठावला आहे. सध्या या मुद्द्यावर मेटाकडून कोणतेही वक्तव्य आलेले नाही. या महिन्याच्या सुरुवातीला, एजीकॉमने अल्फाबेट इंकच्या यूट्यूबवर 2.25 दशलक्ष युरो आणि ट्विचवर 9 लाख युरोचा दंड ठोठावला होता.


गुगलला अमेरिकेत 700 दशलक्ष डॉलरचा दंड


जगातील सर्वात मोठी टेक कंपनी गुगलला (Google) आणखी एक मोठा धक्का बसला आहे. एका अमेरिकन कोर्टाने कंपनीला सुमारे 700 दशलक्ष डॉलरचा दंड ठोठावला आहे. यापैकी 630 दशलक्ष डॉलर 100 दशलक्ष लोकांमध्ये वितरित केले जाणार आहेत. तर 70 दशलक्ष डॉलर निधीमध्ये जमा केले जातील. कंपनीवर अँड्रॉइड प्ले स्टोअरचा गैरवापर करून वापरकर्त्यांकडून जास्त पैसे वसूल केल्याचा आरोप करण्यात आला होता.


जास्त पैसे वसूल केल्याचा आरोप


अल्फाबेटच्या मालकीच्या Google Inc. वर ग्राहकांकडून जास्त शुल्क आकारल्याचा आरोप होता. अँड्रॉईड प्ले स्टोअरवर अॅपमधील खरेदी आणि इतर निर्बंध लादून कंपनी हे पैसे गोळा करत होती. मात्र, गुगलने असे कोणतेही अन्यायकारक माध्यम वापरल्याचा इन्कार केला आहे. पण, तिने लोकांना दंड भरण्याचे मान्य केले. तसेच प्ले स्टोअरवर चांगली सुविधा देण्याचे मान्य केले आहे. यालयाने कंपनीला 700 दशलक्ष डॉलर भरण्यास सांगितले आहे. यापैकी, 630 दशलक्ष डॉलर अमेरिकेच्या 50 राज्यांमध्ये पसरलेल्या 10 कोटी  लोकांमध्ये वितरित केले जातील. याशिवाय डीसी, पोर्तो रिको आणि यूएस व्हर्जिन आयलंडमध्येही पैसे दिले जातील. सप्टेंबरमध्येच हा करार झाला होता. पण, ही बातमी नुकतीच समोर आली आहे. सध्या हा तोडगा न्यायाधीशांच्या अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


गुगलला मोठा धक्का!  कोर्टानं ठोठावला 70 कोटी डॉलरचा दंड, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?