Shani In Purva Bhadrapada Nakshatra : ज्योतिषशास्त्रात शनीला (Shani) विशेष महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रात शनीला न्याय देवता म्हटलं जातं.शनीच्या चालीचा परिणाम हा प्रत्येक राशीच्या लोकांवर होत असतो. काहींवर शनीचा शुभ प्रभाव असतो, तर काहींवर अशुभ प्रभाव पडतो. नुकतंच 12 मे रोजी शनीचं नक्षत्र परिवर्तन झालं आहे. शनीने पूर्वाभाद्रपद नक्षत्राच्या द्वितीय चरणात प्रवेश केला आहे, जिथे शनि 18 ऑगस्टपर्यंत राहील. शनीच्या या नक्षत्र परिवर्तनाचा काही राशींवर नकारात्मक परिणाम पडणार आहे.


वृषभ रास (Taurus)


शनीचं नक्षत्र परिवर्तन वृषभ राशीच्या लोकांसाठी अशुभ समजलं जातं. या काळात तुम्ही खूप मेहनत कराल, पण त्या मेहनतीचं हवं तसं फळ तुम्हाला मिळणार नाही. या काळात कुणाकडूनही उधार पैसे घेऊ नका, अन्यथा तुम्हाला नुकसान सहन करावं लागू शकतं. या काळात मित्रांसोबत तुमचे वाद होऊ शकतात, त्यामुळे काहीही बोलण्यापूर्वी दोनदा विचार करा, वाद होतील अशी वक्तव्यं टाळा. या काळात नोकरीत तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागेल. सहकारी तुमच्या विरोधात षडयंत्र रचू शकतात. करिअरबाबत तुम्ही थोडे चिंतेत राहाल आणि नवीन नोकरी शोधण्याचा प्रयत्नात तुम्ही दिसाल.


तूळ रास (Libra)


शनीच्या नक्षत्र परिवर्तनामुळे तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. या काळात तुम्हाला आर्थिक समस्यांचा सामना तर करावा लागेलच, पण तुम्हाला मानसिक ताणाचा सामना देखील करावा लागेल. व्यवसायात तुम्हाला फटका बसू शकतो, मोठ्या तोट्याचा सामना करावा लागू शकतो. तुमच्या आरोग्याची सर्वात जास्त काळजी घ्या. नोकरदारांना थोड्या कामासाठी जास्त मेहनत करावी लागू शकते. नोकरीत तुम्हाला थोडं दडपण जाणवेल. 


कुंभ रास (Aquarius)


कुंभ राशीच्या लोकांवर शनि नक्षत्र परिवर्तनाचा नकारात्मक प्रभाव पडेल. या काळात पैसे विचार करुन खर्च करा. सर्व निर्णय जपून घ्या. तुमच्या आर्थिक स्थितीवर या काळात विपरीत परिणाम होऊ शकतात. तुम्हाला पैसे मिळवण्यात काही अडथळ्यांचा सामना करावा लागेल. तीन महिन्याच्या काळात वेळोवेळी तुमच्यासमोर आव्हानं येऊन ठाकतील. यासोबतच तुमच्या जोडीदारासोबत तुमचे काही मुद्द्यावरून मतभेद होऊ शकतात, वैवाहिक जीवनात कटूता निर्माण होऊ शकते.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Shani Dev : शनीने नक्षत्र बदललं; 'या' 3 राशींचा सुवर्ण काळ सुरू, पैशांची होईल भरभराट