Travel : मागील काही आठवड्यात देशासह राज्यभरात उष्णतेची लाट पाहायला मिळाली. यामुळे सर्व नागरिक हैराण झाल्याचे पाहायला मिळाले. आता याच उकाड्यापासून लवकरच सुटका होणार असून मान्सून अवघ्या काही दिवसातच महाराष्ट्रात बरसणार आहे. त्यामुळे अनेक निसर्गप्रेमी आणि पर्यटकांचे मान्सून पिकनिकचे प्लॅन बनतील. आज आम्ही तुम्हीला पुणे जवळील एक अशा पिकनिक स्पॉट बद्दल सांगणार आहोत. जिथे गेल्यानंतर तुम्हाला शांतता तर वाटेल, सोबतच निसर्गाचा मनमुराद आस्वादही घ्याल..


 


पुण्यापासून काही तासांच्या अंतरावर हा सुंदर निसर्गरम्य घाट


पुणे हे महाराष्ट्रातील एक सर्वात समृद्ध शहरांपैकी एक असून इथल्या प्रवास प्रेमींना अनेक गोष्टी अनुभवण्याची संधी देते. पुण्याच्या आजूबाजूला बघण्यासारखे खूप काही आहे. अनेक सुंदर ठिकाणे आहेत, जी तुम्ही एक्सप्लोर करू शकाल. त्यातील एक म्हणजे ताम्हिणी घाट. पुण्यापासून ताम्हिणी घाट सुमारे 40 किमी आहे. च्या अंतरावर आहे. ताम्हिणीचे सुंदर पर्वत तुम्हाला अक्षरश: वेड लावतील. जेव्हा तुम्ही दूरवर हिरवळ पाहाल, तेव्हा तुम्हाला यापेक्षा सुंदर काहीही सापडणार नाही. ताम्हिणी घाटात हिरवळ, तलाव आणि धबधबा आहे. हा नजारा पाहिल्यानंतर तुम्ही मंत्रमुग्ध व्हाल. वीकेंडला फिरण्यासाठी ताम्हिणी घाट हे उत्तम ठिकाण आहे.


 


कसे पोहोचायचे?


ताम्हिणी घाट रोड हे निसर्गप्रेमी आणि फोटोप्रेमींसाठी उत्तम ठिकाण आहे.


पुणे किंवा मुंबईहून तुम्ही स्वतःच्या गाडीने ताम्हिणीला येऊ शकता.


पुण्याहून मुळशी तलाव मार्गे ताम्हिणीला पोहोचाल.


तुम्ही मुंबईहून येत असाल तर रसायनी, इमॅजिका थीम पार्क आणि पाली मार्गे ताम्हिणी घाटात पोहोचता येईल.


जर तुमच्याकडे स्वतःची कार नसेल तर कॅब किंवा टॅक्सी बुक करा. 


 


काय पाहाल?


ताम्हिणी घाट हे पुण्याचे एक ऑफबीट डेस्टिनेशन आहे ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. निसर्गप्रेमींसाठी इथे अनके पिकनिक स्पॉट पाहण्यासारखे आहेत.


 




ताम्हिणी धबधबा


ताम्हिणी घाटातील सर्वात प्रसिद्ध ठिकाण म्हणजे ताम्हिणी धबधबा. हा धबधबा डोंगराच्या उंचीवरून पडतो आणि खाली एक पूल बनतो. खाली पडणारे पाणी पाहणे एक सुखद अनुभव असतो. हे तुम्हाला येथे आल्यावर समजेल. या धबधब्यात तुम्ही आंघोळही करू शकता. ताम्हिणी धबधबा हे तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत मजा करण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे. ताम्हिणीला गेलात तर हा धबधबा नक्की बघा.




अंधरबन ट्रेक - चित्तथरारक दृश्य पाहण्याचा अनुभव


जर तुम्हाला निसर्गासोबत साहसाची आवड असेल तर तुम्ही येथे हायकिंग देखील करू शकता. अंधरबन ट्रेक तुम्हाला ही संधी देते. हा ट्रेक ताम्हिणीच्या घनदाट जंगलातून जातो. वाटेत तुम्हाला अनेक नाले आणि छोटे धबधबे दिसतील. अंधरबन ट्रेक पॉईंटवर पोहोचल्यावर आजूबाजूचे चित्तथरारक दृश्य पाहून तुम्ही सर्व काही विसरून जाल. इथे तासनतास बसून निसर्गाच्या दृश्यांचा आनंद लुटू शकता.




मुळशी


मुळशीत तुम्हाला धरण आणि सुंदर तलाव पाहायला मिळतात.  ताम्हिणी घाटाजवळ एक सुंदर ठिकाण आहे. ते म्हणजे मुळशी तलाव.. तुम्ही तुमच्या मित्रपरिवारासह मुळशी तलाव पाहण्यासाठी येऊ शकता. आजूबाजूला पसरलेल्या हिरवाईमध्ये तुम्ही पिकनिक करू शकता. या तलावात तुम्ही बोटिंग देखील करू शकता. रिव्हर राफ्टिंग करायचं असेल तर मुळशी धरण हे उत्तम ठिकाण आहे. एकंदरीत, इथे बरेच काही आहे, जे तुम्ही एन्जॉय करू शकता.


 


कैलासगड किल्ला - इथले निसर्गसौंदर्य तुम्हाला भुरळ पाडेल.


 


ताम्हिणी घाटावर गेल्यास कैलासगड किल्लाही फिरू शकतो. हा किल्ला डोंगरी किल्ला आहे. कैलासगड हा किल्ला मुळशी धरणाजवळ मौला नदीच्या उगमस्थानी आहे. हा किल्ला पाच डोंगरांनी बनलेला आहे. या किल्ल्यावर जाण्यासाठी ट्रेक करावा लागेल. घनदाट जंगलातून जाताना तुम्ही या डोंगरी किल्ल्यावर पोहोचू शकाल. किल्ल्याभोवती पसरलेले सौंदर्य तुम्हाला भुरळ पाडेल.


 


हेही वाचा>>>


Travel : महाराष्ट्रातील एक 'असा' चमत्कारी धबधबा! ज्याचे पाणी उलट दिशेने वाहते, पावसाळ्यात इथे भेट द्या..


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )