Kangana Ranaut Update : कंगना रनौत (Kangana Ranaut) बॉलिवूड सिनेमांसोबत देशात आणि जगात घडणाऱ्या घडामोडींवर सतत तिची मतं व्यक्त करत असते. वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत राहणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत  पुन्हा एकदा अडचणीत सापडली आहे. कंगना रनौत विरोधात एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे कंगनाने आता बोल्ड फोटो शेअर करत तिची प्रतिक्रिया दिली आहे. 


वाइनच्या ग्लासचा फोटो केला शेअर
कंगना रनौतने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. काळ्या रंगाचा हॉट ड्रेस आणि हाहात वाइनचा ग्लास असलेला फोटो कंगनाने शेअर केला आहे. 



फोटो शेअर करत लिहिला संदेश
कंगनाने असा फोटो शेअर केल्यामुळे ती एफआयआरकडे दुर्लक्ष करते आहे, असे स्पष्ट होते आहे. कंगनाने फोटो शेअर करत विरोधकांना उत्तर दिले आहे. कंगनाने लिहिले आहे,"नवीन दिवस नवीन एफआयआर... जर मला अटक करायला आले तर घरी माझा मूड असा आहे". 


कंगनाची इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह टिप्पणी
कंगनाने इन्साट्रामवर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याने तिच्या मुंबईतील खारमधल्या घरासमोर शीख समुदायाकडून निदर्शने करण्यात आली. तसेच कंगनाविरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली. कंगनाला मुंबईतूनच नव्हे तर राज्यातून हद्दपार करा, अशी मागणी शीख समुदायाकडून करण्यात आली होती. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे मागे घेतले. मोदींच्या या घोषणेनंतर कंगना रनौतने वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. कंगनाचे ट्विटर अकाउंट हटवण्यात आले असले तरीही ती इंस्टाग्रामच्या माध्यमातून तिची मतं व्यक्त करताना दिसते. कंगनाने इंस्टा स्टोरीमध्ये लिहिलेले,"संसदेत निवडून आलेल्या सरकारच्या बदल्यात रस्त्यावरचे लोक कायदे करू लागले तर ते जिहादी देश आहे. ज्यांना हे हवे होते त्या सर्वांचे अभिनंदन".


संबंधित बातम्या


Kangana Ranaut Update : कंगना रनौतच्या अडचणीत वाढ, शेतकऱ्यांना म्हणाली 'खलिस्तानी'


Kangana Ranaut : कंगनाची इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह टिप्पणी, शीख समुदाय आक्रमक


Kangana Ranaut On Farm Laws : कंगना रनौत पुन्हा बरळली, मोदींनी कृषी कायदे मागे घेतल्याने कंगना भडकली


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha