SHIB coin : क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी जगभरातल्या लोकांसाठी हा आठवडा भलताच चांगला गेल्याचं दिसून येतंय. या आठवड्यात बिटकॉईनची किंमत वाढली आहे. इथेरियम आणि चेनलिंक या क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीतही 5 टक्क्यांची वाढ झाली आहे. पण महत्वाचं म्हणजे गेल्या 24 तासात शिबा इनू काईनच्या किंमतीत तब्बल 47 टक्क्यांची वाढ झाल्याने या क्रिप्टोकरन्सीचा व्यवहार करणारे मालामाल झाले आहेत. याला कारणीभूत आहे ते म्हणजे इलॉन मस्कचे ट्वीट. 


इलॉन मस्कने चार दिवसांपूर्वी त्याच्या फ्लोकी या नावाच्या शिबा इनू जातीच्या कुत्र्याचा फोटो शेअर केला होता. तो शिबा इनू कॉईनच्या समर्थनार्थ एक सांकेतिक ट्वीट होता. त्यानंतर शिबा इनूच्या किंमतीत चांगलीच वाढ होत गेली. गेल्या 24 तासात तर याच्या किंमत्तीत आश्चर्यकारक 47 टक्क्यांची वाढ झाल्याचं नोंदवण्यात आलं आहे. 


 






इलॉन मस्कने या आधी बिटकॉईन आणि डॉजकॉईनच्या समर्थनार्थ अनेक सांकेतिक ट्वीट्स केले आहेत. त्याने ज्या-ज्या वेळी असे ट्वीट केले आहेत त्या-त्या वेळी डॉजकॉईनच्या किंमतीत चांगलीच वाढ झाल्याचं दिसून आलंय. बिटकॉईनची किंमत गेल्या पाच महिन्यातील सर्वाधिक वरच्या पातळीवर म्हणजे 55,735.52 डॉलर्सवर पोहोचली आहे.


डॉजकॉईनची खिल्ली उडवण्यासाठी शिबा कॉईनची सुरुवात
बिटकॉईनची सुरुवात झाल्यानंतर त्याची खिल्ली उडवण्यासाठी म्हणून 2013 मध्ये डॉजकॉईनची सुरुवात करण्यात आली होती. म्हणजे डॉजकॉईनची सुरुवात काही गंभीरपणे करण्यात आली नव्हती. आपण इंटरनेटवर 'डॉज मिम्स' पाहतो, ज्यामध्ये एका कुत्र्याचा चेहरा असतो, त्या मीम्समचे मूळच डॉजकॉईन आहे. पण नंतरच्या काळात डॉजकॉईन भलतेच वधारले. मग गेल्या वर्षी या डॉजकॉईनची खिल्ली उडवण्यासाठी आणि गंमत म्हणून शिबा कॉईनची सुरुवात करण्यात आली.  


पण खऱ्या अर्थाने सांगायचं तर शिबा कॉईनची किंमत अजूनही खूप कमी आहे. ती 0.00003367 डॉलर्स म्हणजे एक पेनीपेक्षाही कमी आहे. 


महत्वाच्या बातम्या :