एक्स्प्लोर

EPFO : एटीएम आणि यूपीआयद्वारे PF चे पैसे कसे काढायचे? जाणून घ्या प्रक्रिया, जूनमध्ये नवी प्रणाली लाँच होण्याची शक्यता

EPFO : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून जून महिन्यात नवी प्रणाली लागू केली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर एटीएम आणि यूपीआयद्वारे पैसे काढण्याची सुविधा सुरु होऊ शकते.

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ईपीएफओकडून नवा प्लॅटफॉर्म लाँच केला जाऊ शकतो. ईपीएफओ 3.0 प्लँटफॉर्म लाँच करण्याची तयारी पूर्ण करण्यात  आली आहे. नवा प्लॅटफॉर्म लाँच केल्यानंतर खातेदारांना पीएफ खात्यातील रक्कम काढण्यासाठी मोठी प्रक्रिया आवश्यक नसेल. ईपीएफओचा नवा प्लॅटफॉर्म लाँच झाल्यानंतर खातेदारांना एटीएम आणि यूपीआयद्वारे पैसे काढता येऊ शकतात. 

डीडी न्यूजच्या वृत्तानुसार जून 2025 पासून ईपीएफ खातेदार यूपीआय किंवा एटीएमच्या माध्यमातून पीएफची रक्कम काढू शकतात. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना त्यांच्या खातेदारांना चांगली सुविधा देण्यासाठी EPFO 3.0  प्लॅटफॉर्म लाँच करणार आहे. ऑटो क्लेम सेटलमेंट, डिजिटल करेकशन, एटीएम बेस्ड फंड विड्रॉल आणि यूपीआयद्वारे पीएफ रक्कम काढण्याची सुविधा प्राप्त होईल. 

नव्या सुविधांनुसार ईपीएफ सदस्य यूपीआय आणि एटीएमद्वारे पैसे काढू शकतील. याशिवाय पीएफ शिल्लक रक्कम देखील तपासू शकतात. खातेदार त्यांच्या पसंतीच्या बँक खात्यात पीएफची रक्कम वर्ग देखील करु शकतात. नवी प्रणाली सुरक्षित असेल, ओटीपी पडताळणीद्वारे ईपीएफ खातं अपडेट करु शकतात. 

ATM द्वारे पीएफचे पैसे कसे काढता येणार? 

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना पीएफ खातेदारांना विड्रॉल कार्ड दिले जातील. जे एटीएम कार्ड सारखे असतील. हे कार्ड पीएफ खात्यासोबत लिंक असेल. जेवढी रक्कम काढायची असेल त्यासाठी ऑनलाईन क्लेम करावा लागेल. आता 90 टक्के दावे ऑटोमेटिक सेटल होतात. 3 दिवसात क्लेम सेटल होतो.ज्यामुळं सबस्क्रायबर्स एटीएम कार्डद्वारे पीएफ खात्यातून पैसे काढता येतील.पीएफ खात्यातील शिल्लक रक्कम काढणं मात्र जे कारण दिलं असेल त्याच्याशी निगडित असेल.

पीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी तुमचा यूएएन क्रमांक सक्रीय असणं आवश्यक आहे. यूएएन क्रमांक मोबाईलशी लिंक असला पाहिजे. यूएएनसोबत केवायसी कागदपत्रं आधार कार्ड, पॅन क्रमांक आणि खाते नंबर, आयएफसी क्रमांकासोबत लिंक असणं आवश्यक आहे.  याशिवाय पत्ता, ओळखपत्र, कॅन्सल चेक आणि आयएफएससी कोड, बँक खातं क्रमांक एटीएम यूपीआय इंटिग्रेशन असंल पाहिजे.

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Closing Auction Session : शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने खरेदीदारांना मोठा झटका, पाच दिवसातच दरात सात हजारांची वाढ तर चांदीच्या दरात 14 हजारांची वाढ
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने खरेदीदारांना मोठा झटका, पाच दिवसातच दरात सात हजारांची वाढ तर चांदीच्या दरात 14 हजारांची वाढ

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
Ranchi Student Protest : रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
Embed widget