EPFO EPS Pension : ईपीएफओच्या पेन्शनधारकांना दिलासा? पेन्शन 1000 रुपयांवरुन 3000 रुपये होणार असल्याच्या चर्चा, CBT ची बैठक कधी?
EPFO : ईपीएफओ म्हणजेच एम्प्लॉईज प्रोविडंट फंड ऑर्गनायझेशनच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजची 240 वी बैठक लवकरच होणार आहे. या बैठकीकडे पेन्शनधारकांचं लक्ष लागलंय.

नवी दिल्ली : ईपीएफओनं 240 व्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजची बैठक गुजरातमधील गीर ऐवजी नवी दिल्लीत घेण्याचा निर्णय घेतला आहे. ही बैठक 19 नोव्हेंबरला होणार आहे. या बैठकीत ईपीएफओकडून ईपीएस पेन्शन योजनेतून मिळणाऱ्या मासिक पेन्शनची रक्कम 1000 रुपयांवरुन 3000 रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, अशा प्रकारच्या चर्चा सुरु आहेत.
ईपीएफओनं सीबीटीची बैठक गुजरातऐवजी नवी दिल्लीत घेण्याचा निर्णय घेतला आहे.या बैठकीच्या पार्श्वभूमीवर किमान ईपीएस पेन्शनची रक्कम वाढवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, अशा प्रकारचे रिपोर्ट प्रसिद्ध झाले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार ईपीएफओकडून किमान ईपीएस पेन्शन 1000 रुपयांवरुन 3000 रुपये करण्याबाबत विचार केला जातोय. रिपोर्टनुसार केंद्रीय श्रम मंत्रालय या संदर्भातील निर्णय घेताना वित्त मंत्रालयाशी चर्चा करुन नंतर निर्णय घेईल.
सीबीटीच्या 19 नोव्हेंबरच्या बैठकीत ईपीएस पेन्शनवाढीचा मुद्दा स्वतंत्र अजेंड्यावर असेल, असा देखील दावा केला जातोय. ईपीएस पेन्शन वाढीसंदर्भात वृत्त प्रकाशित काही माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालं असलं तरी अद्याप ईपीएफओनं अथवा केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाकडून यासंदर्भात उत्तर देण्यात आलेलं नाही.
फेब्रुवारी 2014 पासून किमान पेन्शन रक्कम 1000 रुपये आहे. फेब्रुवारी 2014 मध्ये सीबीटी म्हणजेच ईपीएफओच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजनं ईपीएस पेन्शन 1000 रुपये करण्याचा निर्णय घेतला होता. तत्कालीन वित्त मंत्र्यांनी 2014-15च्या अर्थसंकल्पात याची घोषणा केली होती. तर, केंद्र सरकारनं ऑगस्ट 2014 मध्ये यासंदर्भातील नोटिफिकेशन काढलं होतं.
ईपीएस पेन्शनधारकांकडून किमान मासिक पेन्शन 7500 रुपये करण्याची मागणी करण्यात येत आहे. सध्याची किमान पेन्शन 1000 रुपये आहे. यामध्ये उदरनिर्वाह करणं शक्य नसल्यानं किमान पेन्शन रक्कम 7000 रुपये करण्याची माणी आहे. ईपीएफओकडून ईपीएस योजनेद्वारे पेन्शन दिली जाते. किमान पेन्शन रक्कम 1000 रुपये असून कमाल पेन्शन रक्कम निश्चित केलेली नाही.
दरम्यान, पेन्शन रक्कम ही पेन्शन योग्य सेवा आणि पगारावर अवलंबून असते. ईपीएससाठी पगाराची रक्कम 25000 रुपये निश्चित करण्यात आली आहे. जी 15 हजार रुपयांवरुन सप्टेंबर महिन्यात वाढवण्यात आली होती. ईपीएस 2026 नुसार नियोक्त्यांकडून दिलं जाणारं योगदान मूळ वेतनाच्या 8.33 टक्के किंवा 2083 रुपये यापेक्षा जे कमी असेल तितकं असेल.
महत्त्वाच्या बातम्या























