एक्स्प्लोर

EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2 मार्चला ईपीएफओच्या बोर्डाची महत्त्वाची बैठक, व्याज दरावर निर्णय होणार 

EPFO : ईपीएफओची 2 मार्च 2026 रोजी आर्थिक वर्ष 2025-26 चे व्याज दर ठरवण्यासाठी बैठक पार पडणार आहे. व्याज दर किती राहणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

नवी दिल्ली : ईपीएफओ म्हणजेच एम्पलॉईज प्रॉविडंट फंड ऑर्गनायझेशनकडून महत्त्वाची बैठक 2  मार्चला आयोजित करण्यात आली आहे. या दिवशी ईपीएफओकडून आर्थिक वर्ष 2025-26 साठी व्याज दर निश्चित केले जातील. त्यामुळं ईपीएफओ खातेदारांचं लक्ष 2 मार्चच्या बैठकीत काय निर्णय होणार याकडे लागलं आहे. 

ईपीएफओच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजची बैठक 2 मार्चला होणार आहे. या बैठकीत केंद्र सरकारचे प्रतिनिधी, कंपन्यांचे प्रतिनिधी, कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित असतात. या बैठकीत ईपीएफओकडून करण्यात आलेल्या गुंतवणुकीवर किती परतावा मिळाला यावर व्याज दर किती ठेवायचा हे निश्चित केलं जातं. 

ईपीएफओकडून 2025-26 या आर्थिक वर्षासाठी व्याजदर 8.25 टक्के ठेवला जाईल अशा आशा व्यक्त केल्या जात आहेत. आगामी काळातील पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पुदुच्चेरी या ठिकाणच्या निवडणुका लक्षात घेऊन व्याज दरात कपात करण्याचा निर्णय सरकार टाळण्याची शक्यता आहे. 

रिपोर्टनुसार ईपीएफओकडून 25-26 लाख कोटी रुपयांच्या निधीचं व्यवस्थापन केलं जातं. निवृत्ती नियोजन, करमुक्त निश्चित परतावा यामुळं ईपीएफओचं महत्त्व आहे. बँकेच्या मुदत ठेवी पेक्षा अधिक परतावा ईपीएफओतील गुंतवणुकीतून मिळतो. 

ईपीएफओच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्र्स्टीजची बैठक ऑक्टोबर महिन्यात पार पडली होती. त्या बैठकीत पीएफ खात्यातून ठराविक रक्कम काढण्याची प्रक्रिया सुलभ करण्याचा निर्णया निर्णय घेण्यात आला होता. पीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी जी 13 कारणं होती त्यात कपात करुन ती  आवश्यक गरजा (आजारपण, शिक्षण, लग्न), घर बांधणी वगैरे आणि विशेष स्थिती या तीन प्रवर्गात विभागणी करण्यात आली आहे. 

पीएफ खात्यातून रक्कम काढण्याची मर्यादा देखील वाढवण्यात आली आहे. शिक्षणासाठी 10 वेळा पैसे काढता येऊ शकतात. लग्नासाठी 5 वेळा रक्कम काढता येऊ शकते. 12 महिने म्हणजेच एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर पीएफ खात्यातून काही कारणांसाठी पैसे काढता येतील.  

महत्त्वाच्या बातम्या

Metro 13: मीरा भाईंदर ते वसई विरार मेट्रोनं जोडणार, 25 किमीच्या मेट्रो-13 वर 16 स्थानकं, 17,725 कोटींचा खर्च 
मुंबई-पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेला नवी गती, मेट्रो 13 आणि पुण्यातील रिंगरोडच्या खर्चास मान्यता 
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
कमी गुंतवणूक, नफा अधिक! दररोज फक्त 195 रुपयांची बचत करा, 10 लाख रुपये मिळवा, पोस्टाची 'ही' आहे भन्नाट योजना 
कमी गुंतवणूक, नफा अधिक! दररोज फक्त 195 रुपयांची बचत करा, 10 लाख रुपये मिळवा, पोस्टाची 'ही' आहे भन्नाट योजना 
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget