एक्स्प्लोर

Elon Musk : ठरलं! Elon Musk ट्विटरच्या CEO पदाचा राजीनामा देणार; 'CEO पदाची जबाबदारी घेणारा मूर्ख सापडल्यावर पायउतार होणार'

Elon Musk will Resign : एलॉन मस्क (Elon Musk) ट्विटरच्या (Twitter) सीईओपदाचा (CEO) राजीनामा देणार आहेत. मस्क यांनी ही मोठी घोषणा केली आहे.

Elon Musk Tweet : जगातील श्रीमंत व्यक्ती (Richest Person in the World) आणि ट्विटरचे (Twitter) मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांनी मोठी घोषणा केली आहे. एलॉन मस्क यांनी ट्विटरच्या CEO पदाचा राजीनामा देणार असल्याचं जाहीर केलं आहे. ट्विटरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदाचा राजीनामा देण्याचे संकेत दिले होती. काही दिवसांपूर्वी मस्क यांनी ट्विटरवर पोल (Elon Musk Twitter Poll) घेत नेटकऱ्यांना विचारलं होतं की, 'मी ट्विटरच्या CEO पदाचा राजीनामा द्यावा का? तुम्ही सांगाल तसं मी करेन.' मस्क यांच्या या ट्विटमुळे (Elon Musk Tweet) मोठी खळबळ माजली होती. त्यानंतर आता एलॉन मस्क यांनी सीईओपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे.

मस्क ट्विटरच्या सीईओपदाचा राजीनामा देणार (Elon Musk to step down as Twitter CEO)

ट्विटर कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदाचा लवकरच राजीनामा देणार असल्याची मोठी घोषणा एलॉन मस्क यांनी केली आहे. त्यांनी ट्विट करत ही मोठी घोषणा केली आहे. एलॉन मस्क यांनी ट्विटमध्ये लिहिलंय, 'मी ट्विटरच्या CEO पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. ट्विटरचं सीईओ पद सांभाळण्यासाठी पात्र असा मूर्ख व्यक्ती सापडताच मी लगेच राजीनामा देईन. त्यानंतर मी फक्त सॉफ्टवेअर चालवेल आणि सर्व्हर टीमच्या कामकाजावर लक्ष ठेवेन.'

ट्विटर पोलमध्ये काय समोर आलं?

मस्क यांनी 19 डिसेंबर रोजी सकाळी ट्विटरवर पोल करत विचारलं होतं की, 'मी ट्विटरच्या CEO पदाचा राजीनामा द्यावा का? तुम्ही सांगाल तसं मी करेन.' या पोलवर 57.5 टक्के लोकांनी मस्क यांनी राजीनामा द्यावा यासाठी मतदान केलं आहे. तर 42.5 टक्के लोकांच्या मते मस्क यांनी राजीनामा देऊ नये. सीएनबीसीच्या मंगळवारी आलेल्या एका अहवालानुसार, एलॉन मस्क ट्विटरच्या नवीन सीईओच्या शोधात आहेत. 

दोन महिन्यानंतरच CEO पदावरून मस्क होणार पायउतार

एलॉन मस्क यांनी ट्विटरची जबाबदारी स्वीकारून अवघे दोन महिने झाले आहेत. त्यामुळे ट्विटर पोल मस्क यांच्यासाठी निराशाजनक ठरला आहे. सीईओपदाची जबाबदारी स्वीकारून फक्त दोन महिने झाले असताना, नेटकऱ्यांनी त्यांना ट्विटरच्या सीईओ पदावरून हटवण्यासाठी मतदान केले आहे. ट्विटर पोलनुसार, मस्क यांनी CEO पदावरून पायउतार होणार असल्याची घोषणा केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

सरकारी नोकरीची मोठी संधी, शिक्षण फक्त 10 वी, रेल्वेत 4 हजार 600 पदासाठी थेट भरती 
सरकारी नोकरीची मोठी संधी, शिक्षण फक्त 10 वी, रेल्वेत 4 हजार 600 पदासाठी थेट भरती 
Gold Rates: सुवर्णनगरीत सोनं झालं स्वस्त; दिवाळी पाडव्याला पत्नीसाठी घ्या सोनं, 10 ग्रॅम सोन्याचा आजचा लेटेस्ट दर किती?
सुवर्णनगरीत सोनं झालं स्वस्त; दिवाळी पाडव्याला पत्नीसाठी घ्या सोनं, 10 ग्रॅम सोन्याचा आजचा लेटेस्ट दर किती?
NSE च्या ऑप्शन्स व्यवहारांना पुन्हा गती मिळण्याची शक्यता; 7 डिसेंबरपासून CAS चे सुधारित नियम लागू
NSE च्या ऑप्शन्स व्यवहारांना पुन्हा गती मिळण्याची शक्यता; 7 डिसेंबरपासून CAS चे सुधारित नियम लागू
Old Monk Rum Latest Marathi News: 5 महिन्यांपासून बंदी असलेल्या Old Monk च्या विक्रीचा मार्ग खुला, पण नेमकं काय बदलणार?; पाहा A टू Z माहिती
5 महिन्यांपासून बंदी असलेल्या Old Monk च्या विक्रीचा मार्ग खुला, पण नेमकं काय बदलणार?; पाहा A टू Z माहिती

व्हिडीओ

Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा
Gokul Chairman Rajesh Patil: हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?
Gokul Chairman Election 2026: गोकुळमध्ये शासननियुक्त 4 संचालक पोहोचले तेव्हा...काय घडलं?, VIDEO
Vivekanand Patil Gokul Morcha Speech : कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण
Varsha Usgaonkar Majha Katta: कॉलेजचे किस्से ते सिनेमातील प्रवास,वर्षा उसगांवकरांसोबत दिलखुलास गप्पा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Laxman Hake : मराठा समर्थक अन् लक्ष्मण हाकेंच्या समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी; सोलापूरच्या आडेगावमधील बिरोबा यात्रेतील उपस्थितीवर आक्षेप, पोखरापूरमध्ये नेमकं काय घडलं?
मराठा समर्थक अन् लक्ष्मण हाकेंच्या समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी; सोलापूरच्या आडेगावमधील बिरोबा यात्रेतील उपस्थितीवर आक्षेप, पोखरापूरमध्ये नेमकं काय घडलं?
Video: पाडव्यादिनी सुनील तटकरे बारामतीत; सुनेत्रा पवारांसोबत 45 मिनिटे चर्चा, विलिनीकरणाच्या मुद्द्यावर स्पष्टच बोलले
Video: पाडव्यादिनी सुनील तटकरे बारामतीत; सुनेत्रा पवारांसोबत 45 मिनिटे चर्चा, विलिनीकरणाच्या मुद्द्यावर स्पष्टच बोलले
तुमचं पण दूध जातं का गोकुळात? पिट्याभाईची कमेंट, अध्यक्ष निवडीनंतर कलाकारांमध्येही गोकुळची चर्चा
तुमचं पण दूध जातं का गोकुळात? पिट्याभाईची कमेंट, अध्यक्ष निवडीनंतर कलाकारांमध्येही गोकुळची चर्चा
बारामतीत 10 हजार पणत्यांनी उजळला सनसेट पॉईंट; अजित दादांच्या आठवणीत बारामतीकर भावूक
बारामतीत 10 हजार पणत्यांनी उजळला सनसेट पॉईंट; अजित दादांच्या आठवणीत बारामतीकर भावूक
Maharashtra Live blog updates: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणानंतर बॉलिवूड कलाकारांना मुंबई पोलिसांचा सुरक्षा अलर्ट
Maharashtra Live blog updates: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणानंतर बॉलिवूड कलाकारांना मुंबई पोलिसांचा सुरक्षा अलर्ट
दफनविधीसाठी जागा मिळेना, 8 तासांपासून मृतदेह प्रतिक्षेत; पीडित कुटुंबीयांचा संताप, तोडगा काढण्याचा प्रयत्न
दफनविधीसाठी जागा मिळेना, 8 तासांपासून मृतदेह प्रतिक्षेत; पीडित कुटुंबीयांचा संताप, तोडगा काढण्याचा प्रयत्न
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 नोव्हेंबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 नोव्हेंबर 2026 | मंगळवार
Gokul Chairman Election 2026: गोकुळच्या अध्यक्षपदी अजित पवारांचा 'राईट हँड' राजेश पाटील यांची निवड; महायुतीने अखेर कंडका पाडलाच, नेमकं काय काय घडलं?, A टू Z माहिती
गोकुळच्या अध्यक्षपदी अजित पवारांचा 'राईट हँड' राजेश पाटील यांची निवड; महायुतीने अखेर कंडका पाडलाच, नेमकं काय काय घडलं?, A टू Z माहिती
Embed widget