एक्स्प्लोर

Electricity Bill : सर्वसामान्यांना 420 व्होल्टचा झटका! फॅन-लाईट तर सोडाच, घर कायमचं बंद असलं तरी भरावं लागणार वीज बिल, 'हा' प्रस्ताव लागू झाला तर खिशाला भुर्डंद

Electricity Bill : केंद्रीय विद्युत प्राधिकरणाने वीज बिलातील फिक्स्ड चार्ज वाढवण्याचा प्रस्ताव मांडला आहे. हा प्रस्ताव लागू झाल्यास घर बंद असलं तरी ग्राहकांना ठराविक वीज बिल भरावं लागू शकतं.

मुंबई : पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या वाढत्या दरांमुळे आधीच सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं असताना आता वीज बिलाबाबतही मोठा आर्थिक झटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्रीय विद्युत प्राधिकरणाने (CEA) वीज बिलातील फिक्स्ड चार्ज वाढवण्याचा प्रस्ताव मांडला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास वीज वापर कमी असला किंवा घर पूर्णपणे बंद असले तरी ग्राहकांना दर महिन्याला ठराविक रक्कम भरावी लागू शकते.

सध्या वीज बिलामध्ये दोन प्रकारचं शुल्क आकारलं जातं. पहिले म्हणजे प्रत्यक्ष वापरलेल्या वीज युनिट्सचे शुल्क आणि दुसरे म्हणजे फिक्स्ड चार्ज. हा फिक्स्ड चार्ज वीज वापर कमी-जास्त असला तरी प्रत्येक महिन्याला निश्चित स्वरूपात आकारला जातो. आता हा निश्चित शुल्काचा हिस्सा वाढवण्याचा प्रस्ताव समोर आला आहे.

Electricity Bill Fixed Charges Proposal : घर बंद असले तरी भरावा लागेल ठरलेला शुल्क

हा प्रस्ताव लागू झाल्यास कमी वीज वापरणाऱ्या ग्राहकांनाही मोठा फिक्स्ड चार्ज भरावा लागू शकतो. उदाहरणार्थ, एखादे कुटुंब महिनाभरासाठी बाहेरगावी गेले आणि घरात वीज वापरच झाला नाही, तरीही ठरलेले फिक्स्ड शुल्क भरावं लागेल. त्यामुळे वीज वापरली नाही तरी बिल भरावे लागेल अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते.

CEA Proposal : वीज कंपन्यांना फिक्स्ड चार्ज वाढवण्याची गरज का?

वीज वितरण कंपन्यांचा मोठा खर्च ट्रान्समिशन लाईन्स, सबस्टेशन, देखभाल, कर्मचारी वेतन आणि संपूर्ण वितरण यंत्रणा कार्यरत ठेवण्यासाठी होतो. मात्र त्यातील कमी हिस्सा फिक्स्ड चार्जमधून वसूल होतो. रूफटॉप सोलरच्या वाढत्या वापरामुळे अनेक ग्राहक स्वतःच वीज निर्मिती करू लागले आहेत, त्यामुळे वितरण कंपन्यांचे उत्पन्न घटत असले तरी पायाभूत सुविधांचा खर्च कायम राहतो.

Electricity Tariff Reform : कोणत्या ग्राहकांवर किती परिणाम?

प्रस्तावानुसार घरगुती आणि कृषी ग्राहकांसाठी फिक्स्ड चार्जचा हिस्सा एकूण खर्चाच्या 25 टक्क्यांपर्यंत वाढवला जाऊ शकतो. तर उद्योग, मॉल आणि मोठ्या व्यावसायिक ग्राहकांसाठी 2030 पर्यंत हा हिस्सा 100 टक्क्यांपर्यंत नेण्याचा विचार आहे. यामुळे भविष्यात वीज बिलातील मोठा भाग निश्चित शुल्काच्या स्वरूपात असू शकतो.

Middle Class Impact : मध्यमवर्गाच्या बजेटवर वाढू शकतो ताण

महागाई, ईएमआय आणि रोजच्या खर्चामुळे आधीच त्रस्त असलेल्या मध्यमवर्गासाठी हा प्रस्ताव चिंतेचा विषय ठरू शकतो. विशेषतः वीज बचत करून बिल कमी ठेवणाऱ्या कुटुंबांवर याचा अधिक परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र सध्या हा केवळ प्रस्ताव असून अंतिम निर्णय संबंधित वीज नियामक आयोगांकडून घेतला जाणार आहे.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

ऊसाला 5 हजार 500 रुपयांचा दर मिळावा, अन्यथा ऊस तोडू देणार नाही, राजू शेट्टींचा एल्गार, नेमक्या काय आहेत मागण्या?
ऊसाला 5 हजार 500 रुपयांचा दर मिळावा, अन्यथा ऊस तोडू देणार नाही, राजू शेट्टींचा एल्गार, नेमक्या काय आहेत मागण्या?
Home Loan : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  
RBI :रुपया सावरण्यासाठी आरबीआयचा मोठा निर्णय, थेट डॉलर विक्री करणार, नियम कठोर करण्याचा निर्णय
रुपया सावरण्यासाठी आरबीआयचा मोठा निर्णय, थेट डॉलर विक्री करणार, नियम कठोर करण्याचा निर्णय
लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, त्याआधी करावं लागणार 'हे' महत्वाचं काम, अन्यथा लाभापासून राहालं वंचित
लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, त्याआधी करावं लागणार 'हे' महत्वाचं काम, अन्यथा लाभापासून राहालं वंचित

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं

आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
Embed widget