FYJC Online Admission : मुंबई (Mumbai) अकरावी प्रवेशाच्या (FYJC Online Admission) पहिल्या गुणवत्ता यादीत (Merit List) कॉलेज मिळालेल्या विद्यार्थ्यांपैकी 50 टक्क्यांपेक्षा कमी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. इतर विद्यार्थी अजूनही नामांकित कॉलेज मिळवण्यासाठीच्या प्रतीक्षेत आहेत. पहिल्या यादीत 1,39,651 विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालं होतं. त्यातील फक्त 67,963 विद्यार्थ्यांनी कॉलेज दिलेल्या वेळेत निश्चित्त केलं आहे. त्यामुळे 1 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी अजूनही कॉलेजच्या प्रतीक्षेत आहेत. अकरावी प्रवेशाच्या पहिल्या गुणवत्ता यादीनंतर आता दुसऱ्या गुणवत्ता यादीची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा आहे. 


दुसऱ्या यादीसाठी पसंती क्रमांक देण्यासाठी पुढील वेळापत्रक 


7 ते 9 ऑगस्ट : विद्यार्थ्यांनी अर्जाच्या भाग दोन मध्ये कॉलेज पसंती क्रमांक देणे
12 ऑगस्ट : दुसरी गुणवत्ता यादी होणार
12 ते 17 ऑगस्ट : दुसरी गुणवत्ता यादीत मिळालेले कॉलेज निश्चित करण्यासाठी वेळ 


मुंबईत अकरावी ऑनलाईन प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली. मात्र, या पहिल्या गुणवत्ता यादीमध्ये फक्त 58 टक्के विद्यार्थ्यांना कॉलेज (College) मिळालं होतं. तर जवळपास 1 लाख विद्यार्थी (Students) हे कॉलेजच्या प्रतीक्षेत आहेत. प्रवेश अर्ज भरताना कॉलेजचा पसंती क्रमांक टाकताना केलेल्या चुका आणि मुंबईतील नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्याचा अट्टाहास, यामुळे विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत कॉलेज मिळाले नसल्याचा समोर आले आहे. त्यामुळे आता येणाऱ्या दुसरी फेरीत तरी कॉलेज मिळावं त्यासाठी विद्यार्थ्यांचे प्रयत्न सुरु आहेत.


सीबीएसई बोर्डाच्या निकालामुळे रखडलेली अकरावी प्रवेशाची प्रक्रिया सुरु जरी झाली तरी पहिल्या फेरीनंतर अजूनही 42 टक्के विद्यार्थ्यांना मुंबईत कॉलेज मिळालेले नाहीत. मुंबईतील नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा असा विचार करत विद्यार्थ्यांनी पहिल्या फेरीत कॉलेजचे पसंती क्रमांक दिले आणि या पहिल्या फेरीनंतर नामांकित कॉलेजचे कट ऑफ हे यावेळी सुद्धा नव्वदी पार गेले. त्यामुळे 90 टक्के पेक्षा कमी गुण असलेल्या अनेक विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत कॉलेज मिळालेच नाहीत. 


कॉलेज निवडताना विद्यार्थ्यांनी काय करावं?


आता तुम्ही म्हणाल मग विद्यार्थ्यांनी कॉलेज निवडताना नेमकं काय करायचं? शिक्षण तज्ञांच्या मतं विद्यार्थ्यांनी पसंती क्रमांक देताना कॉलेज कट ऑफ पाहावं, ज्यानं एखाद्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार की नाही? याचा अंदाज येईल. शिवाय आपल्या जवळच कॉलेज निवडण्यासंदर्भात विचार करावा जेणेकरुन विद्यार्थ्यांचा अधिकाधिक वेळ वाचेल आणि तो वेळ अभ्यासासाठी देता येईल.


एकतर प्रवेश प्रक्रिया उशिरानं सुरु झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनो नामांकित कॉलेजच्या अट्टहास न करता, कॉलेजचा कट ऑफ बघा, आपल्या जवळचे कॉलेज निवडा, नुसतेच कॉलेज निवडू ठेवू नका, तर पुढच्या फेरीत ते मर्यादित वेळेत निश्चित करुन अकरावी-बारावीच्या अभ्यासाला लागा. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


FYJC Online Admission : मुंबईत अकरावी प्रवेशासाठी अजूनही जवळपास एक लाख विद्यार्थी कॉलेजच्या प्रतीक्षेत


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI