एक्स्प्लोर

US Share Market : अमेरिकन शेअर बाजारात मोठी पडझड; भारतीय बाजारावर घसरणीचे सावट

US Share Market : महागाईच्या आकडेवारीनंतर मंगळवारी अमेरिकन शेअर बाजारात मोठी पडझड झाली. याचा परिणाम भारतीय बाजारावर दिसण्याची शक्यता आहे.

US Share Market Fallen: अमेरिकन शेअर बाजारात (US Share Market) मागील दोन वर्षातील सर्वात मोठी पडझड दिसून आली. अमेरिकन शेअर बाजारात झालेल्या या पडझडीचा परिणाम आशियाई (Asian Share Market) आणि भारतीय शेअर बाजारावर (Indian Share Market) दिसून येण्याची शक्यता आहे. अमेरिकन शेअर बाजारातील तिन्ही प्रमुख निर्देशांकात जून 2020 नंतरची मोठी घसरण दिसून आली. अमेरिकेत महागाईने पुन्हा डोके वर काढल्याने बाजारात घसरण झाल्याचे म्हटले जात आहे. 

अमेरिकन शेअर बाजाराचा निर्देशांक डाओ जोन्समध्ये 1276 अंकांनी म्हणजे जवळपास 3.94 टक्क्यांच्या घसरणीसह  31,104.97 अंकांवर बंद झाला. एस अॅण्ड पी 500 निर्देशांकात 177.72 अंकांची म्हणजे जवळपास 4.32 टक्क्यांच्या घसरणीसह 3,932.69  अंकांवर बंद झाला. नॅस्डॅकमध्ये 632.84 अंकांनी म्हणजे 5.16 टक्क्यांच्या घसरणीसह 11,633.57 अंकांवर व्यवहार करत होता. 

ऑगस्ट महिन्यात अमेरिकेतील महागाईचा दर 8.3 टक्के इतका नोंदवण्यात आला. अमेरिकेतील महागाईचा दर हा अपेक्षेपेक्षा अधिक दिसून आल्याने बाजारात पडझड झाल्याचे दिसून आले. महागाईचा दर वाढल्याने अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह व्याज दर वाढ करण्याची शक्यता आहे. 

SGX Nifty मध्ये 1.5 टक्क्यांची घसरण

अमेरिकन शेअर बाजारात झालेल्या पडझडीचा परिणाम SGX Nifty सह आशियाई शेअर बाजारावर दिसून आला. बाजारात घसरण दिसून आली आहे. आज सकाळी SGX Nifty निर्देशांक 258 अंकांच्या म्हणजे 1.58 टक्क्यांच्या घसरणीसह 17807  अंकांवर व्यवहार करत होता. सिंगापूरच्या शेअर बाजारात 1.25 टक्के, जपानच्या शेअर बाजारात 2.09 टक्के, हाँगकाँगमध्ये 0.18 टक्के, कोरियन शेअर बाजारात 1.70 टक्क्यांची घसरण दिसून आली. 

आशियाई शेअर बाजारात होत असलेल्या घसरणीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर होण्याची शक्यता आहे. भारतीय शेअर बाजाराची सुरुवात गॅप डाऊनने होण्याची शक्यता आहे. मागील दोन दिवस भारतीय शेअर बाजारात तेजी दिसत आहे. निफ्टीने चार महिन्यानंतर 18 हजार अंकांचा टप्पा गाठला. तर, मंगळवारी सेन्सेक्स 60,566 अंकांवर बंद झाला. शेअर बाजारातील व्यवहार थांबले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक असलेला सेन्सेक्स 451 अंकांच्या तेजीसह 60,566 अंकांवर स्थिरावला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 130 अंकांच्या तेजीसह 18, 070 अंकांवर बंद झाला. 

महत्त्वाच्या बातम्या

Elon Musk : इलॉन मस्क यांची मोठी घोषणा, अमेरिकेतील प्रत्येक मुलाला SpaceX चा एक शेअर देणार, मस्क यांच्या घोषणेचं नेमकं कारण काय?
इलॉन मस्क यांची मोठी घोषणा, अमेरिकेतील प्रत्येक मुलाला SpaceX चा एक शेअर देणार 
JIO IPO : जिओच्या आयपीओसाठी अँकर इन्वेस्टर्सची 30 पट मागणी, 8110 कोटींसाठी अडीच लाख कोटींची बोली, विदेशी आणि भारतीय फंड हाऊसेसचा दमदार प्रतिसाद
जिओच्या आयपीओसाठी अँकर इन्वेस्टर्सची 30 पट मागणी, विदेशी आणि भारतीय फंड हाऊसेसचा दमदार प्रतिसाद
Gold Silver Rate: सोने-चांदीच्या किंमतीत पुन्हा येणार चढ-उतार? नेमकं काय आहे कारण? जाणून घ्या काय आहेत आजचे दर
सोने-चांदीच्या किंमतीत पुन्हा येणार चढ-उतार? नेमकं काय आहे कारण? जाणून घ्या काय आहेत आजचे दर
JIO IPO : जिओ आयपीओ : 5G नेटवर्क, ब्रॉडबँड आणि AI आधारित भारताच्या आगामी डिजीटल दशकात पाऊल टाकण्याचं तिकीट
जिओ आयपीओ : 5G नेटवर्क, ब्रॉडबँड आणि AI आधारित भारताच्या आगामी डिजीटल दशकात पाऊल टाकण्याचं तिकीट

व्हिडीओ

Tiger Shroff Car Attack: बॉलिवूडमधली पहिली सुपारी ते टायगर श्रॉफवर गोळीबार, VIDEO
Mumbai Police PC On Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, पोलिसांची ईनडिटेल प्रेस | ABP Majha
Kolhapur Gokul : गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीला वेग; दुसरी फेरी सुरू
Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election Result 2026: जिंकलेला उमेदवार पडला, सतेज पाटील लगेच मतमोजणी केंद्रावर पोहोचले, गोकुळ निवडणुकीतील शेवटचा राडा, नेमकं काय घडलं?
जिंकलेला उमेदवार पडला, सतेज पाटील लगेच मतमोजणी केंद्रावर पोहोचले, गोकुळ निवडणुकीतील शेवटचा राडा, नेमकं काय घडलं?
Atharva Sudame Shares Apologizing Video For Kushal Badrike Allgeations: 'मी कलाकारांना घरी बोलावलं आणि...'; कुशल बद्रिकेनं चिडून केलेल्या आरोपांनंतर, अथर्व सुदामेकडून थेट उत्तर, नेमकं घडलं काय? VIDEO
'मी कलाकारांना घरी बोलावलं आणि...'; कुशल बद्रिकेनं चिडून केलेल्या आरोपांनंतर, अथर्व सुदामेकडून थेट उत्तर, नेमकं घडलं काय? VIDEO
RSS Vijayadashami 2026: 'वंदे मातरम्'सह मंचावर 'खास' संदेश, पारंपरिक शस्त्रांसह भारतीय बनावटीचं अस्मि अत्याधुनिक कार्बाइन; स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाचं यंदाचं वैशिष्ट्य काय?
'वंदे मातरम्'सह मंचावर 'खास' संदेश, पारंपरिक शस्त्रांसह भारतीय बनावटीचं अस्मि अत्याधुनिक कार्बाइन; स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाचं यंदाचं वैशिष्ट्य काय?
Farmers Death Maharashtra: कर्जमाफीच्या यादीत नाव आलं नाही, नांदेडच्या शेतकऱ्याने रडतरडत प्राण सोडले, काळीज हेलावून टाकणारा व्हिडीओ
कर्जमाफीच्या यादीत नाव आलं नाही, नांदेडच्या शेतकऱ्याने रडतरडत प्राण सोडले, काळीज हेलावून टाकणारा व्हिडीओ
Vishwas Nangre Patil and Chandrashekhar Bawankule: रेशीमबागेत संघाच्या विजयादशमी उत्सवाला कडेकोट बंदोबस्त, आयुक्त विश्वास नांगरे ऑन फिल्ड, पांढरा शर्ट-खाकी पँटमधील बावनकुळे समोर येताच भेटले, नेमकं काय घडलं?
संघाच्या विजयादशमी उत्सवाला कडेकोट बंदोबस्त, विश्वास नांगरे ऑन फिल्ड, पांढरा शर्ट-खाकी पँटमधील बावनकुळे समोर येताच भेटले, नेमकं काय घडलं?
Satej Patil : गोकुळच्या निवडणुकीत महायुतीला फटका, सतेज पाटलांच्या विजयाची इनसाईड स्टोरी, सहा प्रमुख मुद्दे
गोकुळच्या निवडणुकीत महायुतीला फटका, सतेज पाटलांच्या विजयाची इनसाईड स्टोरी, सहा प्रमुख मुद्दे
Salman Khan Bigg Boss 20 Weekend Ka Vaar: सलमान खाननं टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर उचललं महत्त्वाचं पाऊल? 'बिग बॉस 20'बाबत घेतला मोठा निर्णय, म्हणाला...
सलमान खाननं टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर उचललं महत्त्वाचं पाऊल? 'बिग बॉस 20'बाबत घेतला मोठा निर्णय, म्हणाला...
Gokul Election Result 2026: गोकुळचा निकाल बाजूने लागला पण अचानक 'अदृश्य' शक्ती सक्रिय, दगाफटक्याची कुणकुण लागताच सतेज पाटील-राजू शेट्टी मतमोजणी केंद्रावर पोहोचले अन्...
गोकुळचा निकाल बाजूने लागला पण अचानक 'अदृश्य' शक्ती सक्रिय, दगाफटक्याची कुणकुण लागताच सतेज पाटील-राजू शेट्टी मतमोजणी केंद्रावर पोहोचले अन्...
Embed widget