Gold Prices: अमेरिकोमधील राष्ट्राध्यक्षपदाचा निकाल लागल्यानंतर अमेरिकन फेडरल बँकेच्या व्याज दरात बदल झाला आहे. याचा परिणाम म्हणजे, त्यानंतर सोन्याच्या दरांत अंदाजे पंधराशे  रुपयांची घसरण झाली आहे. ट्रम्प इफेक्ट म्हणून ही घसरण मानली जात आहे. 


अमेरिकेत राष्ट्रध्यक्ष निवडीत डोनाल्ड ट्रम्प विजयी झाल्यानंतर जागतिक पातळीवर झालेल्या आर्थिक घडामोडीचा परिणाम जळगावच्या सुवर्ण नगरीमध्येही पाहायला मिळाला आहे. सोन्याच्या दरांत दोन दिवसांत दोन हजार रुपयांची घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. 


अमेरिकेनं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीपूर्वी घोषणा केली होती की, आपण विजयी झाल्यावर युद्ध शमविण्याचा प्रयत्न करणार आहोत, त्यांच्या या घोषणेनंतर त्यांचा विजय झाला असल्यानं, जागतिक पातळीवर युद्धजन्य परिस्थिती निवळेल, अशी आशा गुंतवणूक दारात निर्माण झाल्यानं, सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळलेले ग्राहक पुन्हा अन्य ठिकाणी गुंतवणुकीकडे वळू लागले आहेत. त्यांचा परिणाम म्हणूनच सोन्याच्या मागणीत मोठी घट झाली आणि सोन्याच्या दरांत घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे, असा दावा सोनं व्यावसायिकांनी केला आहे. सोन्याच्या दरांत झालेली ही घसरण मात्र ग्राहकांना दिलासा देणारी ठरली आहे


आज सोन्याचा दर काय? 


गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात वाढ होताना दिसत आहे. दिवाळीनंतर किंचित नरमाई आली असली तरी भाव अजूनही चढेच आहेत. 24 कॅरेट सोन्याचा भाव 80,000 रुपयांच्या खाली आला आहे, तर चांदीचा भावही 1,00,000 रुपयांच्या खाली गेला आहे. आज, शनिवारी, 9 नोव्हेंबर रोजी 22 कॅरेट सोन्याचा भाव 72,000 रुपयांवरून 72,850 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 78,560 रुपयांवरून 79,470 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. त्याचवेळी चांदीचा भाव 93,000 रुपयांऐवजी 94,000 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.