Navra Maza Navsacha 2: मराठी सिनेमा म्हटलं की चित्रपटगृहात फार तर आठवडाभर किंवा दोन चार दिवस जास्तीचे चालतील असं गणित ठरलेलं. पण काही चित्रपट याला अपवाद आहेत. नवरा माझा नवसाचा हा त्यातलाच एक म्हणावा लागेल. मराठी चित्रपट पहायला लोक फार जात नाहीत अशी कुरकुर कायम कानी पडत असताना नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटानं सलग 50 दिवस प्रेक्षकांचं प्रेम मिळवल्याचं कळतंय. अभिनेते सचीन पिळगावकर यांनी नुकतीच या चित्रपटाला प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमाची पोस्ट करत त्यांनी चाहत्यांचे आभार मानले आहेत.


अभिनेते अशोक सराफ, सचिन पिळगावकर यांचा नवरा माझा नवसाचा हा चित्रपट सुपरहीट ठरल्यानंतर तब्बल १९ वर्षांनी या सिनेमाचा दुसरा भाग चित्रपटगृहांमध्ये दाखल झाला. या चित्रपटालाही प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याचं दिसतंय. अभिनेते सचिन पिळगावकर यांनी या चित्रपटाला थेएटरमध्ये मिळालेल्या पोचपावतीवर चाहत्यांचे आभार मानणारी एक पोस्ट केली आहे.


काय आहे पोस्टमध्ये?


आमचा नवरा माझा नवसाचा 2 हा चित्रपट 50 व्या दिवशीही चित्रपटगृहांमध्ये चालताना पाहून मला अतिशय आनंद झाला आहे. या चित्रपटाचा निर्माता म्हणून माझी पहिलीच वेळ हेाती. या चित्रपटासाठी अनेक सुंदर आव्हाने पेलत हा चित्रपट यशस्वी झालाय. हे फक्त बाप्पाच्या आणि तुमच्या आशीर्वादाने शक्य झालं आहे.  माझे कुटुंब, कलाकार मंडळी, हितचिंतक, माझे लाडके प्रेक्षक चाहते आणि सर्वाात महत्वाचं म्हणजे गणपती बाप्पाच्या आशीर्वादानंच शक्य झालंय. 


 






नवरा माझा नवसाचा 2 हा सिनेमा केवळ प्रेक्षक रसिकांसाठी बनवला गेला होता. तुम्ही या सिनेमाला भरभरुन प्रतिसाद दिलात. तुमच्या प्रेमाबद्दल तुमचे आणि संपूर्ण टीमचे मन:पूर्वक आभार! शिकणे कधीही थांबत नाही.. आणि मी वचन देतो की मी अधिक मेहनत करत तुमचं मनोरंजन करत राहीन. तुमच्या आशीर्वादासाठी आणि प्रेमासाठी खूप खूप धन्यवाद.. असं लिहित सचिन पिळगावकर यांनी चाहत्यांचे आभार मानले आहेत.


श्रियानंही केली बाबांविषयी पोस्ट


अभिनेत्री श्रिया पिळगावकर हिनेही तिच्या इंस्टाग्रॅमवर नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाचा 50 दिवसांचा पल्ला पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन आणि वडिलाविषयी कृतज्ञता व्यक्त करणारी पोस्ट केली आहे. तिनं लिहिलंय..
आजचा दिवस खास आहे कारण आमचा मराठी चित्रपट - नवरा माझा नवसाचा 2 चित्रपटगृहात 50 दिवस पूर्ण करत आहे!


चित्रपटसृष्टीत काम करत असताना 61 व्या वर्षी दिग्दर्शक म्हणून माझ्या वडिलांचा हा 23 वा चित्रपट आहे  याची कल्पनाही करायला हरकत नाही. यावेळी त्यांनी चित्रपटाचे निर्मिती करण्याचा निर्णयही घेतला. सर्व आव्हानांमधून, त्याला त्याच उत्कटतेने, दृढनिश्चयाने, केवळ कथा आणि सिनेमाच्या प्रेमासाठी काम करताना पाहणे खूप प्रेरणादायी आहे.


पप्पांसोबत काम करण्याची संधी


चित्रपट बनत असताना मला पापासोबत काम करण्याची संधी मिळाली. एक अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता, लेखक आणि निर्माता देखील हाताळणे हा केवळ पराक्रम नाही. तो खरोखरच वन मॅन आर्मी आहे आणि खूप तणावपूर्ण दिसणाऱ्या दिवसांतही त्याच्या चेहऱ्यावर नेहमी स्मितहास्य असायचे आणि "मला प्रत्येक गोष्ट आवडते. मला एक चांगले चॅलेंज घ्यायला आवडते"


 






मी त्याचे निरीक्षण करून खूप काही शिकले आहे . मला साहजिकच या आयकॉनिक सिक्वेलचा एक प्रकारे भाग व्हायचं होतं त्याचप्रमाणे चित्रपटातील गणपतीच्या गाण्यातही कॅमिओ केला होता.आम्हाला पाठिंबा देणाऱ्या सर्व लोकांचे खूप खूप आभार आणि तुमच्या सर्व प्रेमाबद्दल प्रेक्षकांचे आभार! गणपती बाप्पा आणि तुमच्या आशीर्वादाने हे घडलेबाबा, तुम्ही इंडस्ट्रीत 61 वर्षे काम करत असलात तरी माझ्यावर विश्वास ठेवा.. ही तर फक्त सुरुवात आहे.. तुझ्यावर प्रेम आहे. मला तुझा खूप अभिमान आहे माझा रॉकस्टार. गणपती बाप्पा मोरया.. अशी पोस्ट श्रियानं केली आहे.