मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची (Maharashtra Assembly Elections 2024) रणधुमाळी सुरु झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक होणार असून 20 नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या पार्श्वभूमीवर महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) घटकपक्षांकडून निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येत आहे. आता भाजपचा जाहीरनामा (BJP Manifesto) उद्या प्रसिद्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 


महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या प्रचारासाठी सभांचा धुराळा उडाला आहे. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) मैदानात उतरले आहेत. शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशिक आणि धुळ्यात सभा पार पडली. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सातारा, कोल्हापूर, सांगलीत सभा पार पडली. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi), काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) देखील महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. महाविकास आघाडीकडून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंचसूत्री जाहीर करण्यात आली आहे. 


भाजपचा जाहीरनामा उद्या जाहीर होणार? 


यानंतर भाजप आपला जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या यांचा हस्ते भाजपचा जाहीरनामा उद्या जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमित शाह यांची उद्या मुंबईत पत्रकार परिषद होणार असून यातून ते भाजपचा जाहीरनामा जाहीर करू शकतात. भाजपचा जाहीरनामा नेमका कसा असणार?  याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 


महाविकास आघाडीची पंचसूत्री


दरम्यान, महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणुकीसाठी पंचसूत्री जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील महिलांना महिना ३ हजार रुपये देणार, तसेच महिलांना एसटीचा प्रवासही मोफत असणार, बेरोजगार तरुणांना महिन्याला ४ हजार रुपये मिळणार, शेतकऱ्यांची ३ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी केली जाणार, २५ लाख रुपयांपर्यंत आरोग्य विमा, आणि औषधे मोफत मिळणार, जातनिहाय जनगणना करणार आणि आरक्षणामध्ये वाढ करण्यासाठी प्राधान्य देणार, अशा घोषणा करण्यात आल्या आहेत. 


इतर महत्त्वाच्या बातम्या 


"जयश्री ताई तुमसे बैर नही, सुधीर दादा गाडगीळ अब तुम्हारी खैर नही"; सांगली विधानसभेचे काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांनी विजयाचा विश्वास, तर बंडखोरांना इशारा


Video : शिजायला लागलं की कुणीतरी पातेल्याला लाथ मारतंय, लोकसभेतला पराभव, विधानसभेची संधी हुकल्यानंतर सुजय विखेंनी मन केलं मोकळं!