एक्स्प्लोर

Trump Tariff : भारतावर 50 टक्के ट्रम्प टॅरिफ लागू, सर्वाधिक प्रभाव 'या' क्षेत्रांवर पडणार, अमेरिकेला होणाऱ्या 66 टक्के निर्यातीवर परिणाम होणार

Trump Tariff : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेलं 50 टक्के टॅरिफ आजपासून लागू झालं आहे. भारताच्या अमेरिकेला होणाऱ्या 66 टक्के निर्यातीवर परिणाम होऊ शकतो. 

नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर 50 टक्के टॅरिफ लादण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी आजपासून सुरु झाली आहे. भारतानं रशियाकडून तेली खरेदी सुरु ठेवल्यानं ट्रम्प यांनी  टॅरिफ वाढवण्याचा निर्णय घेतला. 27 ऑगस्ट म्हणजेच आजपासून 50 टक्के टॅरिफ लागू झालं आहे. या निर्णयामुळं  भारताकडून अमेरिकेला होणाऱ्या  86 अब्ज डॉलर्सच्या निर्यातीपैकी  60 अब्ज डॉलर्सची निर्यात प्रभावित होईल. याचा सर्वाधिक परिणाम मस्त्य उत्पादनं, कपडे, चामडे, रत्न आणि दागिने यासारख्या कामगारकेंद्री क्षेत्रांवर परिणाम होईल. 

ट्रम्प टॅरिफचा या क्षेत्रांवर परिणाम (Trump Tariff Impact on this Sector)

अमेरिकेच्या 50 टक्के टॅरिफचा थेट परिणाम कापड क्षेत्रावर होईल. या क्षेत्रातून अमेरिकेला 10.3 अब्ज डॉलर्सची निर्यात होते. रत्न आणि दागिने उद्योगाला देखील याचा मोठा फटका बसणार आहे. या उद्योगासाठी अमेरिका मोठी बाजारपेठ आहे.  

झींगा आणि सागरी उत्पादनांपासून तयार होणाऱ्या खाद्य पदार्थांच्या निर्यातीवर गंभीर परिणाम होणार आहेत चामडे आणि शूज, चपला निर्मितीवर उद्योगावर देखील उत्पादन थांबवण्याची आणि कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याची वेळ येऊ शकते. फर्निचर सारख्या उद्योगावर देखील परिणाम होऊ शकतो. 

ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिवच्या रिपोर्टनुसार अमेरिकेनं भारतावर लादलेल्या 50 टक्के टॅरिफमुळं  सध्याच्या निर्यातीपैकी एकूण 66 टक्के निर्यातीवर परिणाम होईल.  27 ऑगस्टपासून 60.2 अब्ज डॉलर्सच्या किमतीच्या निर्यातीवर 50 टक्के टॅरिफ अमेरिका आकारेल. यामध्ये कापड, रत्न आणि झींगा याचा समावेश आहे. 

भारतावरील ट्रम्प टॅरिफचा 'या' देशांना फायदा

जीटीआरआयचे सह संस्थापक अजय श्रीवास्तव यांनी म्हटलं की भारताला गेल्या अनेक वर्षांमधील सर्वात मोठा व्यापारी धक्का आहे. आर्थिक वर्ष 2025 -26  मध्ये भारताची अमेरिकेला होणारी निर्यात 49.6 अब्ज डॉलर्सपर्यंत कमोही होऊ शकते. भारतावरील टॅरिफमुळं चीन, व्हिएतनाम, मेक्सिको, तुर्की, पाकिस्तान, नेपाळ आणि केनिया या देशांना फायदा होईल. 

दरम्यान, रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्ध सुरु असताना भारतानं रशियाकडून तेल खरेदी केल्यानं भारतावर अमेरिकेनं  50 टक्के टॅरिफ लादलं आहे. पहिल्यांदा डोनाल्ड ट्रम्प यांनी 25 टक्के टॅरिफ लादलं होतं. त्यानंतर पुन्हा 25 टक्के टॅरिफची घोषणा करत त्याची अंमलबजावणी 27 ऑगस्टपासून होईल असं सांगितलं होतं. गेल्या अनेक वर्षांमध्ये अमेरिकेकडून भारतावर पहिल्यांदा मोठ्या प्रमाणात टॅरिफ लादलं गेलं आहे. 

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध थांबवल्याचा पुन्हा दावा केला आहे. भारतावर  डोकं गरगरेल इतकं टॅरिफ लावण्याची धमकी युद्ध थांबवण्यासाठी दिली होती, असं ट्रम्प म्हणाले.

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Vimal Pan Masala Owner Net Worth: FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Embed widget