एक्स्प्लोर

देशात साखरेच्या उत्पादनात घट, ISMA कडून आकडेवारी जाहीर; 'या' प्रमुख राज्यात उत्पादन घटलं

यावर्षी देशात साखरेच्या उत्पादनात (Sugar Production) घट झालीय. ISMA ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार चालू वर्षात 15 फेब्रुवारीपर्यंत देशातील साखर उत्पादन 2.48 टक्क्यांनी घटून 2.236 कोटी टन झालं आहे.

Sugar Production : यावर्षी देशात साखरेच्या उत्पादनात (Sugar Production) घट झाली आहे. ISMA ने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार चालू विपणन वर्ष 2023-24 मध्ये 15 फेब्रुवारीपर्यंत देशातील साखर उत्पादन 2.48 टक्क्यांनी घटून 2.236 कोटी टन झालं आहे. वर्षभरापूर्वी याच काळात ते उत्पादन 2.293 कोटी टन होते. साखर विपणन वर्ष ऑक्टोबर ते सप्टेंबर पर्यंत चालते. औद्योगिक संघटना इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (ISMA) च्या ताज्या आकडेवारीनुसार, चालू 2023-24 मार्केटिंग वर्षात साखर उत्पादन 10 टक्क्यांनी कमी होणार आहे. यावर्षी देशात साखरेचं उत्पादन हे 3.305 कोटी टन होण्याची शक्यता इस्माने वर्तवली आहे. जे मागील वर्षी 3.662 कोटी टन होते.

'या' प्रमुख राज्यांमध्ये साखर उत्पादनात घट

इस्माच्या मते चालू विपणन वर्षात 15 फेब्रुवारीपर्यंत महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि तामिळनाडूमध्ये साखरेचे उत्पादन कमी राहिले. तथापि, उत्तर प्रदेशातील साखरेचे उत्पादन आढाव्याच्या कालावधीत वाढून 67.7 लाख टन झाले जे मागील वर्षी याच कालावधीत 61.2 लाख टन होते.देशातील सर्वात मोठे साखर उत्पादक राज्य असलेल्या महाराष्ट्रातील उत्पादन या विपणन वर्षाच्या फेब्रुवारीपर्यंत घटून 7.94 दशलक्ष टन  झाले आहे. जे मागील वर्षीच्या कालावधीत 8.59 दशलक्ष टन होते. त्याचप्रमाणे, देशातील तिसरा सर्वात मोठा उत्पादक असलेल्या कर्नाटकातील उत्पादन या कालावधीत 4.6 दशलक्ष टनांवरून घसरून 4.32 दशलक्ष टन झाले आहे. दरम्यान, इस्माने दिलेल्या माहितीनुसार, चालू विपणन वर्षात 15 फेब्रुवारीपर्यंत देशात सुमारे 505 कारखाने कार्यरत होते. तर वर्षापूर्वीच्या काळात ही संख्या 502 होती. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सुमारे 22 कारखान्यांनी कामकाज बंद केल्याची माहिती इस्माने दिली आहे.

कमी पावसाचा ऊस उत्पादनाला मोठा फटका

देशातील काही भागात यंदा कमी पाऊस (Rain) झाला आहे. त्याचा परिणाम ऊस उत्पादनावर झाल्याचे दिसून येत आहे. यामुळ यंदा साखरेच्या उत्पादनात (Sugar production) घट होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळं सध्या साखरेच्या दरात (Sugar Price) वाढ होताना दिसत आहे. सरकारी आकडेवारीनुसार, सध्या साखरेची सरासरी किंमत 44.62 रुपये प्रति किलो आहे. मागील वर्षीच्या तुलनेच साखरेच्या किंमतीत वाढ झाली आहे. मागील एका वर्षापूर्वी साखरेची किंमत 41.82 रुपये प्रति किलो होती. महाराष्ट्र आणि कर्नाटक या देशातील दोन प्रमुख साखर उत्पादक राज्यांमध्ये उत्पादनात घट झाली आहे. सरकारने उसाच्या रसापासून इथेनॉलचे उत्पादन मर्यादित केले आहे. 2023-24 हंगामात देशांतर्गत वापरासाठी 305 लाख टन नवीन साखरेचे उत्पादन अपेक्षित आहे, जे गेल्या वर्षी 2022-23 हंगामात 330.90 लाख टन होते.

महत्वाच्या बातम्या:

साखरेचं उत्पादन घटलं, देशात आत्तापर्यंत साखरेचं उत्पादन किती?

महत्त्वाच्या बातम्या

Multibagger Stock : संरक्षण क्षेत्रातील मल्टीबॅगर स्टॉकमध्ये घसरण, कंपनी लाभांश देणार, रेकॉर्ड डेट घोषित
संरक्षण क्षेत्रातील मल्टीबॅगर स्टॉकमध्ये घसरण, कंपनी लाभांश देणार, रेकॉर्ड डेट घोषित
सणासुदीच्या काळात साखरेनं दिला दराचा चटका, महिनाभरातच तब्बल 15 टक्क्यांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय?
सणासुदीच्या काळात साखरेनं दिला दराचा चटका, महिनाभरातच तब्बल 15 टक्क्यांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय?
घर घेण्याचं स्वप्न होणार साकार! RBI न घेतला मोठा निर्णय, ग्रामीण बँका आता ग्राहकांना देणार 3 कोटी रुपयांचं गृहकर्ज
घर घेण्याचं स्वप्न होणार साकार! RBI न घेतला मोठा निर्णय, ग्रामीण बँका आता ग्राहकांना देणार 3 कोटी रुपयांचं गृहकर्ज
Devendra Fadnavis Karj Mafi : कर्जमाफीसाठी 5029 कोटी वर्ग, 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; प्रोत्साहनपर रकमेबाबत देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य
6.22 लाख शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये 5029 कोटी रुपये जमा, मुख्यमंत्र्यांकडून प्रोत्साहनपर रकमेबाबत महत्त्वाची अपडेट

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Embed widget