Cryptocurrency Price Today : आज क्रिप्टोकन्सी (Cryptocurrenc) बाजारात मोठी उसळण पाहायला मिळाली आहे. बिटकॉइन (Bitcoin) आणि इथेरियम (Ethereum) या क्रिप्टोकरन्सीच्या किंमती वाढल्याने गुंतवणूकदारांची मोठी कमाई झाली आहे. जागितक क्रिप्टोकरन्सी मध्ये जवळपास 3.3 टक्क्यांनी वाढल्याचं दिसून आलं आहे. गेल्या 24 तासांत बिटकॉइनची किंमत 3.3 टक्क्यांनी वाढून 19,353.76 डॉलर इतकी झाली आहे. बिटकॉइन आणि इथेरियम या क्रिप्टोकरन्सीच्या दरात मोठी वाढ झाली. मागील 24 तासांत क्रिप्टोकरन्सीचा मार्केट वॉल्यूम 90.06 अरब डॉलरवर पोहोचला आहे.
बिटकॉइन आणि इथेरियम या क्रिप्टो करन्सीच्या दरात 3.3 टक्क्यांनी वाढ झाली. गेल्या महिन्यात, जागतिक क्रिप्टोकरन्सीचा मार्केट कॅप 1.1 ट्रिलियन डॉलर इतका होता. तर तीन महिन्यांपूर्वी क्रिप्टोकरन्सीचा मार्केट कॅप 1.26 ट्रिलियन डॉलर वर होता. याच्या तुलनेनं क्रिप्टोकरन्सी बाजार घसरल्याचं दिसत आहे. दरम्यान, आज व्यापारी आणि गुंतवणूकदारांना क्रिप्टोकरन्सी बाजारात चांगला नफा झाला आहे.
क्रिप्टोकरन्सीचे आजचे दर जाणून घ्या.
- बिटकॉइन : गेल्या 24 तासांत बिटकॉइनच्या दरात 3.3 टक्क्यांनी वाढ झाली असून सध्या हा दर 19,353.76 डॉलर वर पोहोचला आहे. असं असलं तरी गेल्या आठवड्याच्या तुलनेत बिटकॉइनच्या दरात 3.3 टक्क्यांनी घसरण झाली आहे.
- इथेरियम : इथेरियम क्रिप्टोकरन्सीच्या दरात एका दिवसात 8.6 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या इथेरियम 1,643.19 डॉलरवर व्यापार करत आहे. गेल्या आठवड्यामध्ये या दरात 5.8 टक्के वाढ झाली आहे.
- BNB मध्ये एका दिवसात 5.9 टक्क्यांनी वाढ झाली असून सध्या BNB 279.20 डॉलरवर व्यापार करत आहे. गेल्या आठवड्यापासून त्यात 0.2 टक्के वाढ झाली आहे.
- XRP चा दर गेल्या 24 तासात 5.0 टक्क्यांनी 0.33 डॉलरवर पोहोचला आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत यामध्ये 1.8 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
- कारडनोच्या दरात आधीच्या दिवसाच्या तुलनेनं 3.4 टक्के वाढ झाली. सध्या याचा दर 0.44 डॉलरवर आहे.
- डॉजकॉइन गेल्या 24 तासांत 3.5 टक्क्यांनी वाढून डॉजकॉइन 0.066 डॉलर पर ट्रेड करत आहे.
- पोल्का डॉटच्या दरात बुधवारच्या तुलनेनं 4.0 टक्क्यांनी वाढ झाल्यानंतर याचा दर 7.19 डॉलरवर आहे.
- शिबू इनू या क्रिप्टोकरन्सीच 2.6 टक्क्यांनी वाढल्यानंतर सध्या 0.0000011 वर व्यापार करत आहे
महत्त्वाच्या इतर बातम्या
Digital Rupee: डिजिटल करन्सी भारतासाठी का महत्वाची? CBDC चं महत्व काय?
Share Market Opening Bell : शेअर बाजारात खरेदीचा जोर, सेन्सेक्स 400 अंकांनी वधारला