Share Market Opening Bell : शेअर बाजारात आज खरेदीचा जोर राहण्याचे संकेत आहेत. आज शेअर बाजारातील (Share Market) व्यवहाराची सुरुवात तेजीसह झाली. फार्मा, ऑटो, एफएमसीजी आणि आयटी शेअर दर वधारले आहेत. बाजार उघडताच निफ्टीने (Nifty) 17750 अंकांची पातळी ओलांडली. तर, सेन्सेक्सने (Sensex) 59400 अंकांचा टप्पा ओलांडला. 


मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक असलेला सेन्सेक्स 346.08 अंकांनी वधारत 59,374.99 अंकावर खुला झाला. तर, एनएसईचा निर्देशांक निफ्टी 123.75  अंकांनी वधारत 17,748 अंकांवर खुला झाला. सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 552 अंकांनी वधारत 59,581.43 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 151 अंकांनी वधारत 17,775.45 अंकावर व्यवहार करत होता. 


सेन्सेक्समधील 30 पैकी 30 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी असल्याचे दिसून आले आहे. त्याशिवाय, निफ्टी 50 मधील 46 शेअर्समध्ये तेजी दिसत आहे. बँक निफ्टीत 343 अंकांची तेजी दिसत असून 39799  अंकावर व्यवहार करत आहे. 


भारती एअरटेल, इंडसइंड बँक, ओएनजीसी, एचडीएफसी आणि कोटक महिंद्रा बँकेत तेजी असल्याचे दिसून येत आहे. सन फार्मा, डॉ, रेड्डीज लॅब, टायटन, आटीसी, मारुती, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, एल अॅण्ड टी, विप्रो, टाटा स्टील, एसबीआय, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, अॅक्सिस बँकेच्या शेअर दरात तेजी दिसून येत आहे. 


निफ्टीत कोल इंडिया, ओएनजीसी, एसबीआय लाइफ आणि हिरो मोटोकॉर्पच्या शेअर दरात घसरण दिसून येत आहे. निफ्टीत एशियन पेंट्स, बीपीसीएल, आयशर मोटर्स, टेक महिंद्रा आणि भारती एअरटेलमध्ये तेजी दिसून येत आहे. 


बुधवारी शेअर बाजारात घसरण 


बुधवारी शेअर बाजारात घसरण दिसून आली. सेन्सेक्समध्ये 168 अंकांची, तर निफ्टीमध्ये 31 अंकांची घसरण झाली. सेन्सेक्समध्ये 0.28 टक्क्यांची घसरण होऊन तो 59,028 अंकांवर स्थिरावला. तर निफ्टीमध्ये 0.18 टक्क्यांची घसरण होऊन तो 17,624 अंकांवर पोहोचला. बँक निफ्टीमध्येही 210 अंकांची घसरण होऊन तो 39,455 अंकांवर स्थिरावला होता. बुधवारी 2073 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली तर 1289 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. एकूण 121 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल नोंदवण्यात आला नाही.


इतर महत्त्वाच्या बातम्या: