Crude Oil Price: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्चा तेलाचे दर 96 डॉलर प्रति बॅरल झाले होते. मागील सात वर्षातील हा सर्वाधिक उच्चांकी दर होता. मात्र, रशिया-युक्रेनमधील तणाव काहीसा निवळल्यानंतर कच्च्या तेलाच्या दरात तीन टक्क्यांनी घट झाली.


रशिया आणि युक्रेनमधील तणावामुळे गेल्या अनेक दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने वाढ होत होती. कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 100 डॉलरच्या पुढे जाण्याची भीती व्यक्त केली जात होती. मंगळवारी 15 फेब्रुवारी रोजी रशियाने युक्रेनच्या सीमेवरून 1.30 लाख सैन्य मागे घेत असल्याचे वृत्त आले. त्यानंतर कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या.


सप्टेंबर 2014 पासून कच्च्या तेलाने प्रति बॅरल $96.78 च्या सर्वोच्च पातळी गाठली आहे. नवीन वर्ष 2022 मध्ये कच्च्या तेलाच्या किमतीत 18 ते 20 टक्क्यांहून अधिक वाढ झाली असून, गेल्या दीड महिन्यांपासून कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. 1 डिसेंबर 2021 रोजी कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल $ 68.87 होती. म्हणजेच दीड महिन्यात कच्च्या तेलाच्या किमती नीचांकी पातळीवरून 34 टक्क्यांनी वाढल्या आहेत.


वर्ष 2022 मध्ये कच्च्या तेलाच्या किमतीत 18 ते 20 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. गेल्या दीड महिन्यांपासून कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. 


भारतातील इंधन दर स्थिर


पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. 4 नोव्हेंबर 2021 पासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. तर कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी झेप घेतली आहे. कच्च्या तेलाच्या किमती वाढूनही सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ केलीन नाही. 


सरकारचा तेल कंपन्यांवर दबाव?


सरकारच्या दबावामुळे कच्च्या तेलाच्या दरात वाढ होऊनही सरकारी तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करत नसल्याची जोरदार चर्चा आहे. सध्या सुरू असेलल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर तूट भरून काढण्यासाठी किमान 5 ते 10 रुपयांनी इंधन दरवाढ होण्याची अंदाज व्यक्त केला जात आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha