Credit Card : बदलत्या काळानुसार आपली जगण्याची पद्धतही खूप बदलली आहे. लोक अधिक डिजिटल माध्यमातून पैसे ट्रान्सफर करण्यास प्राधान्य देतात. गेल्या काही वर्षांत क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI पेमेंट, नेट बँकिंग इत्यादींचा वापर खूप वेगाने वाढला आहे. अशा परिस्थितीत क्रेडिट कार्डचा वापर खूप वाढला आहे. अनेक कंपन्या या बाबतीत अनेक ऑफर्सही देतात. अशा वेळी बरेच लोक दोन कंपन्यांचे क्रेडिट कार्ड ठेवतात. पण एकापेक्षा जास्त क्रेडिक कार्ड ठेवणं तुम्हाला महागात पडू शकतं. कसं ते जाणून घ्या.


आर्थिक बाबींवर संशोधन करणारी कंपनी इन्व्हेस्टोपीडियाने दोन क्रेडिट कार्ड असण्याबाबत केलेल्या संशोधनात असे आढळून आले आहे की, एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरल्याने तुमच्या क्रेडिट कार्डच्या वापराच्या गुणोत्तरावर परिणाम होऊ शकतो. तुम्ही तुमच्या गरजेनुसार क्रेडिट कार्डची संख्या ठेवू शकता. परंतु, जर तुम्ही त्याचे योग्य व्यवस्थापन केले नाही तर तुम्हाला ते ठेवणे कठीण होऊ शकते. योग्य प्रकारे वापर न केल्यास, ते तुमच्यासाठी हानिकारक असू शकते. दोन किंवा अधिक क्रेडिट कार्ड वापरण्याचे फायदे आणि नुकसान जाणून घ्या.    


एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड असण्याचे फायदे :


1. यामुळे क्रेडिट युटिलायझेशन रेशोवर चांगला प्रभाव पडतो. तुमच्याकडे एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड असल्यास, ते तुमच्यावरील एकूण कर्जाचे मूल्य कमी करते. तुमचा क्रेडिट युटिलायझेशन रेशो 30 पेक्षा जास्त असल्‍यास, तुम्‍ही कर्जदार असल्‍याचे मानले जाते. अशा स्थितीत दोन क्रेडिट कार्ड असण्याने तुमचे क्रेडिट व्हॅल्यू वाढते. यामुळे तुमचा CUR कमी होतो. याचा क्रेडिट स्कोअरवर चांगला परिणाम होतो आणि भविष्यात तुम्हाला कोणत्याही प्रकारचे कर्ज घेताना कोणतीही अडचण येत नाही.


2. जर कोणत्याही सक्तीमुळे, तुम्ही एका क्रेडिट कार्डचे बिल भरण्यास सक्षम नसाल, तर तुम्ही दुसऱ्या क्रेडिट कार्डचे बिल भरण्यासाठी शिल्लक ट्रान्सफर सुविधा वापरू शकता. यामुळे तुम्हाला कर्जाची परतफेड करण्यासाठी आणखी काही वेळ मिळेल आणि तुम्हाला मोठा दंड भरावा लागणार नाही.


3. जेव्हा तुम्ही खरेदी करता तेव्हा तुम्हाला कॅशबॅक आणि ऑफर्सद्वारे अधिक सूट मिळण्याची संधी असते. अशा प्रकारे आपण अधिक पैसे वाचवाल.  


एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड असण्याचे तोटे :


दोन क्रेडिट कार्डचे तुम्हाला अनेक फायदे मिळत असले तरी, जर त्याचा योग्य वापर केला नाही तर तुम्ही कर्जाच्या जाळ्यात अडकू शकता. जर तुम्ही दोन्हीची बिले वेळेवर भरली नाहीत, तर तुमच्या CIBIL स्कोअरवर त्याचा खूप वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे क्रेडिट कार्डचा योग्य वापर करा आणि बिल भरण्याच्या वेळेपूर्वी बिल जमा करा. 


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha