Share Market : Sensex 427 तर Nifty 139 अंकांनी घसरला; चार दिवसात गुंतवणूकदारांना 8 लाख कोटी रुपयांचा फटका
Share Market : FMCG सेक्टर सोडलं तर इतर सर्व सेक्टरच्या शेअर्सच्या किंमतींमध्ये घसरण झाली आहे. BSE मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही प्रत्येकी 2 टक्क्यांची घसरण झाली आहे.
मुंबई : सलग चौथ्या दिवशी शेअर बाजारात घसरण झाली आहे. आज शेअर मार्केट बंद होताना सेन्सेक्स 427 अंकांनी घसरला आहे तर निफ्टीही 139 अंकानी घसरला आहे. सेन्सेक्समध्ये 0.72 टक्क्यांची घसरण होऊन तो 59,037 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 0.79 टक्क्यांची घसरण होऊन तो 17,617 वर पोहोचला आहे.
आज बाजार बंद होताना FMCG क्षेत्रातल्या शेअर्समध्ये वाढ झाली. तर सार्वजनिक बँक आयटी, फार्मा आणि रिअॅलिटी सेक्टरसह इतर शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्याचं दिसून आलं आहे. BSE मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही प्रत्येकी 2 टक्क्यांची घसरण झाली आहे.
सुरुवातीला घसरला, नंतर सावरला
बाजाराची सुरुवात झाल्यानंतर सेन्सेक्स सुरुवातीच्या काही मिनीटांत 700 अंक किंवा 1.25 टक्क्यांपेक्षा जास्त घसरून 58,700 वर पोहोचला होता तर NSE निफ्टी 17,550 च्या खाली घसरला होता. बँक निफ्टी 1.6 टक्क्यांपेक्षा जास्त घसरला होता. मात्र बाजार बंद होताना शेअर मार्केट काहीसा सावरला आणि 59,037 वर पोहोचला.
या कंपन्यांचे शेअर्स वधारले
- Bajaj Auto- 3.36
- HUL- 2.81
- Maruti Suzuki- 1.91
- Hero Motocorp- 1.50
- Nestle- 1.28
या कंपन्यांचे शेअर्स घसरले
- Bajaj Finserv- 5.35
- Tech Mahindra- 4.40
- Shree Cements- 3.97
- Coal India- 3.82
- Divis Labs- 3.47
अमेरिकेच्या इक्विटी मार्केटमध्ये सलग पाचव्या दिवशी घसरण झाल्याने त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर झालेला दिसून येतोय. यूएस फेडने व्याजदरात वाढ करण्याचे संकेत दिल्यांने अमेरिकेतील शेअर मार्केटवर चांगलाच परिणाम झाला आहे.