मुंबई: शेअर बाजारासाठी आजचा दिवस काहीसा संथ असल्याचं दिसून आलं आहे. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 35 अंकांची घसरण झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 9 अंकांची वाढ झाली. सेन्सेक्समध्ये 0.06 टक्क्यांची घट होऊन तो 58,817 अंकांवर स्थिरावला. तर निफ्टीमध्ये 0.06 टक्क्यांची वाढ होऊन तो 17,534 अंकांवर स्थिरावला. बँक निफ्टीमध्ये आज 50 अंकांची वाढ होऊन तो 30,287 अंकांवर पोहोचला.


आजच्या दिवशी 1501 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली तर 1817 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली. आज दिवसभरात 119 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही. 


आज शेअर बाजार बंद होताना Hindalco Industries, UPL, Apollo Hospitals, Coal India आणि Tata Steel या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली. तर Bajaj Finance, NTPC, ONGC, HCL Technologies आणि Adani Ports या कंपन्याच्या निफ्टीमध्ये काहीशी घट झाली. 


आज कॅपिटल गुड्स इंडेक्समध्ये एक टक्क्याची वाढ झाली तर मेटलच्या शेअर्समध्ये दोन टक्क्यांची वाढ झाली. तर आयटीच्या शेअर्समध्ये एक टक्क्याची घसरण झाली. 


रुपया 14 पैशांनी वधारला
डॉलरच्या तुलनेत आज रुपयाची किंमत 14 पैशांनी वधारली असून रुपयाची किंमत आज 79.51 इतकी झाली आहे. 


शेअर बाजाराची सुरुवात संथ
शेअर बाजाराची आज संथ सुरूवात झाली. तर किरकोळ स्वरूपात वाढ झाली. आजच्या व्यवहारात, बीएसई 30 शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स 124.27 अंकांच्या किंवा 0.21 टक्क्यांच्या वाढीसह 58,977 वर उघडला. NSE चा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 41.00 अंकांच्या किंवा 0.23 टक्क्यांच्या वाढीसह 17,566 वर उघडला.


या कंपन्यांचे शेअर्स वधारले



  • Hindalco- 4.44 टक्के

  • UPL- 2.16 टक्के

  • Coal India- 2.07 टक्के

  • Apollo Hospital- 2.03 टक्के

  • Tata Steel- 1.87 टक्के


या कंपन्यांचे शेअर्स घसरले



  • Bajaj Finance- 2.63 टक्के

  • NTPC- 2.29 टक्के

  • ONGC- 1.98 टक्के

  • HCL Tech- 1.45 टक्के

  • Adani Ports- 1.38 टक्के


महत्त्वाच्या बातम्या: