Gold Rate Today : भारतीय बाजारपेठेत मागच्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किंमतीत चढ-उतार पाहायला मिळतायत. कालच्या तुलनेत आजचे सोन्याचे दर काहीसे वाढले आहेत. मात्र, चांदीचे दर हजार रूपयांनी कमी झाले आहेत. त्यामुळे तुम्हाला जर चांदी खरेदी करायची असेल तर ही चांगली संधी आहे. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स 0.34 टक्क्यांनी वाढून 24 कॅरेट सोन्याचा दर 52,410 रूपयांवर आला आहे. तर, 1 किलो चांदीचा दर 58,860 रूपयांवर व्यवहार करत आहे. तुमच्या शहरातील आजचे सोन्या-चांदीचे जर नेमके काय आहेत ते जाणून घ्या.
तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे आजचे दर :
शहर | सोने | 1 किलो चांदीचा दर |
मुंबई | 48,043 | 58,860 |
पुणे | 48,043 | 58,860 |
नाशिक | 48,043 | 58,860 |
नागपूर | 48,043 | 58,860 |
दिल्ली | 47,878 | 58,650 |
कोलकाता | 47,896 | 58,680 |
तुमच्या शहराचे दर तपासा :
तुम्ही घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिए शनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल.
खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा :
तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.
महत्वाच्या बातम्या :