मुंबई: आज सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण झाल्याचं दिसून आलं आहे. आज शेअर मार्केट बंद होताना सेन्सेक्स 185 अंकांनी घसरला आहे तर निफ्टीही 61 अंकानी घसरला आहे. सेन्सेक्समध्ये 0.33 टक्क्यांची घसरण होऊन तो 55,381 पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 0.37 टक्क्यांची घसरण होऊन तो 16,522 वर पोहोचला आहे. जागतिक शेअर बाजारात संमिश्र संकेत दिसत आहे. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून येत आहे.

आज 1800 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 1450 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 132 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही. 

आज बाजार बंद होताना फार्मा, उर्जा आणि रिअॅलिटी या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे तर फायनान्शिअर आणि कॅपिटल गुड्स या क्षेत्रातल्या शेअर्सची खरेदी झाल्याचं दिसून आलं. BSE मिडकॅप  आणि स्मॉलकॅपमध्येही अर्ध्या टक्क्यांची घसरण झाली आहे. 

डॉलरच्या तुलनेत आज रुपया काही अंशी वधारला आहे. डॉलरच्या तुलनेत आज रुपयाची किंमत ही 77.52 इतकी झाली आहे.

या कंपन्यांचे शेअर्स वधारले

  • JSW Steel- 3.31 टक्के
  • Coal India- 1.63 टक्के
  • HDFC Life- 1.37 टक्के
  • M&M- 1.26 टक्के
  • HDFC- 1.00 टक्के

या कंपन्यांचे शेअर्स घसरले

  • Bajaj Auto- 3.73 टक्के
  • Apollo Hospital- 3.53 टक्के
  • Tech Mahindra- 2.85 टक्के
  • Hindalco- 2.82 टक्के
  • Britannia- 2.65 टक्के

महत्त्वाच्या बातम्या: