LPG Gas Price : एलपीजी गॅस सिलेंडरचे नवीन दर जाहीर करण्यात आले आहे. व्यावसायिक वापरासाठी असलेल्या 19 किलोच्या एलपीजी गॅस सिलेंडरमध्ये मोठी कपात करण्यात आली आहे. व्यावसायिक वापरासाठीच्या गॅस सिलेंडरच्या दरात 135 रुपयांची कपात करण्यात आली आहे. इंडियन ऑइल कंपनीने नवीन दर जाहीर केले आहेत.
घरगुती एलपीजी ग्राहकांचे काय?
घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर ग्राहकांसाठी असलेल्या 14.2 किलोच्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आला नाही. याआधी एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात 19 मे रोजी दरवाढ करण्यात आली होती.
जाणून घ्या व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजीचे दर
19 किलोंच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरसाठी दिल्लीत 2354 ऐवजी 2219 रुपयांना मिळणार आहे. मुंबईत 2306 ऐवजी 2171.50 रुपये मोजावे लागणार आहेत. कोलकातामध्ये 2454 ऐवजी 2322 रुपयांना एलपीजी गॅस सिलेंडर मिळणार आहे. चेन्नईमध्ये 2507 ऐवजी 2373 रुपयांना उपलब्ध होणार आहे.
एप्रिल-मेमध्ये सातत्याने भाव वाढले
एप्रिल आणि मे महिन्यात व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत सातत्याने वाढ झाली आहे. मागील महिन्यात एक मे रोजी 19 किलोच्या व्यावसायिक वापराच्या एलपीजी गॅस सिलेंडरमध्ये 102 रुपयांनी वाढ झाली होती.
उज्जवला गॅस योजना धारकांना अनुदान
केंद्र सरकारने उज्जवला गॅस योजनाधारकांना दिलासा होता. घरघुती सिलेंडरवर 200 रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता एलपीजी सिलेंडरची किंमत ही 200 रुपयांनी कमी झाली आहे. हे अनुदान वर्षभरातील 12 सिलेंडरवर देण्यात येणार आहे. ही दरकपात तात्काळ लागू करण्यात येणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ही घोषणा केली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या: