Pimpri-Chinchwad Crime: पिंपरी-चिंचवडमधील एका आठ वर्षीय मुलाने कैद्याप्रमाणे फाशी घेतली आहे. महत्वाचं म्हणजे त्याने स्वत:ला फाशी लावण्यापुर्वी बाहूलीला फाशी लावली होती. त्यानंतर त्याने स्वत:ला फाशी लावून घेत आत्महत्या केली. पिंपरी-चिंचवडमधून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. मोबाईलवरील व्हिडीयो पाहून हा प्रकार घडला असावा, अशी शक्यता पोलिसांनी दर्शवली आहे. पिंपरी-चिंचवडजवळील थेरगाव परिसरात ही घटना घडली.


काय आहे प्रकरण?
नेपाळी कुटुंबातील हा मुलगा आहे. ज्या ठिकाणी मुलाने फाशी घेतली त्याच सोसायटीमध्ये वडिल सुरक्षारक्षकाचं काम करतात. आई तिच्या कामात व्यस्त होती.ते तिघे भावंड आहे. त्याचं घर फार लहान आहे. त्याच घरात हे तिघेही खेळत होते. आठ वर्षीय सगळ्यात मोठा मुलगा होता. त्याने सुरुवातीला त्याच्या बाहूलीला फाशी दिली. त्यानंतर बाहूली मृत झाली, असं त्याला वाटलं. बाहूलीला फाशी दिल्यानंतर कपडे वाळू घालण्याच्या दोरीने वापरतात त्याने स्वत:ला फाशी लावून घेतली. बराच वेळ मुलाचा आवाज न आल्याने त्याच्या आईने घरात डोकावून पाहिले असता आईला मुलगा लटकलेल्या अवस्थेत दिसला. या सगळ्यात आठ वर्षीय मुलाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.


घरात टीव्ही नसल्याने मुले मोबाईल बघायची
वडिल सुरक्षारक्षक असल्याने परिस्थिती हलाखीची आहे. त्यामुळे घरात टीव्ही नाही. तिनही मुले घरात मोबाईलवर विरंगुळा करायची. वेगवेगळ्या प्रकारचे व्हीडियो बघत असत. आई-वडिल दोघेही कामात व्यस्त असल्याने मुलांकडे फार लक्ष देणं शक्य होत नव्हतं. रोजच्या प्रमाणे तिन्ही मुले खेळत बसले असताना ही घटना घडली.


पालकांनी मुलांकडे लक्ष देण्याची गरज
अनेक पालक मुलांना मोबाईल देऊन कामात व्यस्त असतात. मुले कोणतेही व्हीडियो बघतात. त्यामुळे त्या पाहिलेल्या व्हीडियोचा मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होतो. मुलेही तसंच वर्तन करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अशा घटनांचं प्रमाण वाढत आहेत. पिंपरी-चिंचवडमधील घडलेली घटना मोबाईलवरील व्हीडियो पाहून घडली आहे, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.