मुंबई: गुरुवारच्या घसरणीनंतर आज पुन्हा एकदा शेअर बाजारात तेजी दिसून आली आहे. आज शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 708 अंकांनी तर निफ्टीही 205 अंकानी वधारला आहे. सेन्सेक्समध्ये 1.21 टक्क्यांची वाढ होऊन तो 59,337 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 1.18 टक्क्यांची वाढ होऊन तो 17,688 वर पोहोचला आहे.
आज 2564 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 645 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 84 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही.
आज बाजार बंद होताना ऑटो, मेटल, उर्जा, ऑईल अॅन्ड गॅस, बँक आयटी, फार्मा आणि रिअॅलिटी यासह सर्वच सेक्टरच्या शेअर्समध्ये 1 ते 4 टक्क्यांची वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. BSE मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही एक टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
शुक्रवारी शेअर बाजारात NTPC, BPCL, Power Grid Corporation, IndusInd Bank आणि SBI या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये मोठी वाढ झाली असून Hero MotoCorp, SBI Life Insurance, Sun Pharma, Tech Mahindra आणि Titan Company या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये घसरण झाली आहे.
या कंपन्यांचे शेअर्स वधारले
- NTPC- 5.89 टक्के
- BPCL- 4.19 टक्के
- Power Grid Corp- 3.81 टक्के
- IndusInd Bank- 3.55 टक्के
- SBI- 2.97 टक्के
या कंपन्यांचे शेअर्स घसरले
- Hero Motocorp- 2.35 टक्के
- Tech Mahindra- 0.82 टक्के
- SBI Life Insurance- 0.72 टक्के
- Sun Pharma- 0.66 टक्के
- Titan Company- 0.60 टक्के
महत्त्वाच्या बातम्या:
- Reserve Bank foundation day : नोटा छपाईचा अधिकार, बँकांची बँक, देशाची आर्थिक पत सांभाळणे, रिझर्व्ह बँकेच्या कामकाजाचा आढावा
- Gold Rate Today : सोन्याचे दर 50 हजारांच्या खाली, तर चांदीही झाली स्वस्त, काय आहेत ताजे दर ?
- Himalaya : हिमालया कंपनीच्या प्रोडक्ट्समध्ये हलालचा वापर? #BoycottHimalaya होतोय ट्रेंड, फोटो व्हायरल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह -
ABP Majha