एक्स्प्लोर

Share Market : सेन्सेक्सची घसरगुंडी, गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान; Sensex 872 अंकानी घसरला

Stock Market Updates : आज सर्वच क्षेत्रातल्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये एक टक्क्यांची घसरण झाली.

मुंबई: शेअर बाजारातील आठवड्याची सुरुवात मोठ्या घसरणीने झाली असून गुंतवणूकदारांना मोठं नुकसान सहन करावं लागलंय. शेअर बाजारात आज सलग दुसऱ्या सत्रात घसरण झाली असून मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 872 अंकांची घसरण झाली आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 267 अंकांची घसरण झाली. सेन्सेक्समध्ये आज 1.46 टक्क्यांची घसरण झाली असून तो 58,773 अंकांवर पोहोचला. तर निफ्टीमध्ये 1.51 टक्क्यांची घसरण झाली असून तो 17,490 अंकांवर पोहोचला. बँक निफ्टीमध्येही 688 अंकांची घसरण झाली असून तो 38,297 अंकांवर पोहोचला. 

आज शेअर बाजारामध्ये 1228 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली तर 2214 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली. आज 163 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही. गेल्या दोन सत्रातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांचं मात्र 6.5 लाख कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचं दिसून येतंय.

सर्वच क्षेत्रात घसरण
आज शेअर बाजार बंद होताना Tata Steel, Asian Paints, Adani Ports, Tata Motors आणि JSW Steel कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. तर ITC, Coal India, Tata Consumer Products, Nestle India आणि Britannia Industries या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली. आज सर्वच क्षेत्रातल्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये एक टक्क्यांची घसरण झाली.  

रुपयाची घसरण
डॉलरच्या तुलनेत आज रुपयाच्या किमतीत 9 पैशांची घसरण झाली असून रुपयाची आजची किंमत 79.87 इतकी आहे. 

शेअर बाजारात आज विक्रीचा दबाव
आठवड्याच्या पहिल्या दिवशी बाजाराची सुरुवात नकारात्मक झाली. बीएसईचा 30 स्टॉक्सचा निर्देशांक सेन्सेक्स 285.07 अंकांच्या घसरणीसह 59,361 अंकांवर खुला झाला होता. तर, एनएसईचा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 75.55 अंकांच्या घसरणीसह 17,682 अंकांवर खुला झाला. सकाळी 9.50 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 516 अंकांची घसरण होऊन 59,126.20 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टीत 155 अंकांची घसरण दिसत असून 17,603.10 अंकांवर व्यवहार सुरू होता. 

या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली

  • TATA Cons. Prod- 0.89 टक्के
  • ITC- 0.77 टक्के
  • Coal India- 0.53 टक्के
  • Britannia- 0.38 टक्के
  • Nestle- 0.06 टक्के

या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली

  • Tata Steel- 4.54 टक्के 
  • Asian Paints- 3.81 टक्के
  • Adani Ports- 3.62 टक्के
  • Tata Motors- 3.48 टक्के
  • JSW Steel- 3.25 टक्के



महत्त्वाच्या बातम्या

Jio New Internet Unlimited Pack: Jio ने लाँच केला देशातील सर्वात स्वस्त इंटरनेट पॅक; फक्त 15 रुपयांमध्ये मिळणार अनलिमिटेड 5G इंटरनेट
Jio ने लाँच केला देशातील सर्वात स्वस्त इंटरनेट पॅक; फक्त 15 रुपयांमध्ये मिळणार अनलिमिटेड 5G इंटरनेट
Donald Trump : मध्यावधी निवडणुकीत ट्रम्प यांच्या पार्टीचा पराभव, अमेरिकन शेअर बाजारात जोरदार तेजीचे संकेत, चीनच्या मार्केटमध्येही तेजीचा ट्रेंड
मध्यावधी निवडणुकीत ट्रम्प यांच्या पार्टीचा पराभव, अमेरिकन शेअर बाजारात जोरदार तेजीचे संकेत
EPFO On WhatsApp : व्हॉट्सअॅपवर EPFO बॅलन्स, पासबुक कसा चेक करायचा?
EPFO On WhatsApp : व्हॉट्सअॅपवर EPFO बॅलन्स, पासबुक कसा चेक करायचा?
दिवाळीपूर्वीच खरेदीदारांना मोठा झटका! सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या सध्याचे दर 
दिवाळीपूर्वीच खरेदीदारांना मोठा झटका! सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या सध्याचे दर 

व्हिडीओ

Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गोकुळमधील दूध उत्पादकांच्या मतांवर दरोडा, जनमताची केलेली ही भेसळच, संचालक 12 वरून 16 करत भाजपचा बहुमतावर ताबा; राहुल गांधींचा भाजपवर सडकून प्रहार, सतेज पाटलांनी सु्द्धा रणशिंग फुंकलं
गोकुळमधील दूध उत्पादकांच्या मतांवर दरोडा, जनमताची केलेली ही भेसळच, संचालक 12 वरून 16 करत भाजपचा बहुमतावर ताबा; राहुल गांधींचा भाजपवर सडकून प्रहार, सतेज पाटलांनी सु्द्धा रणशिंग फुंकलं
Sharad Pawar Health Update: शरद पवारांना पुण्यातून डिस्चार्ज, मग पुन्हा मुंबईत पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात ॲडमिट का केलं? प्रकृती कशी? डॉक्टरांनी दिली अपडेट
शरद पवारांना पुण्यातून डिस्चार्ज, मग पुन्हा मुंबईत पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात ॲडमिट का केलं? प्रकृती कशी? डॉक्टरांनी दिली अपडेट
राजू शेट्टींच्या आंदोलनाचा तिसरा दिवस, आंदोलनातील नेमक्या मागण्या काय अन् कोंडी फोडण्यासाठी कितीवर तडजोडची तयारी? आज चेअरमन, संचालकांच्या दारात 'शिमगा' आंदोलन
राजू शेट्टींच्या आंदोलनाचा तिसरा दिवस, आंदोलनातील नेमक्या मागण्या काय अन् कोंडी फोडण्यासाठी कितीवर तडजोडची तयारी? आज चेअरमन, संचालकांच्या दारात 'शिमगा' आंदोलन
US Elections Results 2026: अमेरिकन मध्यावधी निवडणुकीत पाच भारतीय-अमेरिकन विजयी, सर्व डेमोक्रॅटिक पक्षाचे सदस्य; ट्रम्प विवेक रामास्वामींसाठी मैदानात, तरीही दारुण पराभव
अमेरिकन मध्यावधी निवडणुकीत पाच भारतीय-अमेरिकन विजयी, सर्व डेमोक्रॅटिक पक्षाचे सदस्य; ट्रम्प विवेक रामास्वामींसाठी मैदानात, तरीही दारुण पराभव
Chhatrapati Sambhajinagar: तरुणाला घरातून ओढत नेलं, झाडाला बांधून तलवारी, रॉड, कुऱ्हाडीने मारलं, दगडाने पाय ठेचले, स्क्रू ड्रायव्हर खुपसून जीव घेतला अन्..., संभाजीनगरमध्ये जुन्या वादातून भयानक घडलं
तरुणाला घरातून ओढत नेलं, झाडाला बांधून तलवारी, रॉड, कुऱ्हाडीने मारलं, दगडाने पाय ठेचले, स्क्रू ड्रायव्हर खुपसून जीव घेतला अन्..., संभाजीनगरमध्ये जुन्या वादातून भयानक घडलं
Jayant Patil And Gopichand Padalkar Sangli Marathi News: गोपीचंद पडळकरांनी पहिले टोले मारले, मग भाषणात चुकले; जयंत पाटलांनी कोंडीत पकडले; भर मंचावर सुनावले, सांगलीत काय घडलं?
गोपीचंद पडळकरांनी पहिले टोले मारले, मग भाषणात चुकले; जयंत पाटलांनी कोंडीत पकडले; भर मंचावर सुनावले, सांगलीत काय घडलं?
Ramayana Advance Booking Collection: 'रामायण'चं बॉक्स ऑफिसवर वादळ, अॅडव्हान्स बुकिंगमध्येच 36 लाख तिकीटं विकली, रिलीजपूर्वीच 130 कोटींच्या कमाईचा आकडा पार
'रामायण'चं बॉक्स ऑफिसवर वादळ, अॅडव्हान्स बुकिंगमध्येच 36 लाख तिकीटं विकली, रिलीजपूर्वीच 130 कोटींच्या कमाईचा आकडा पार
Shani Sade Sati: एक 'अशी' रास, जिची तब्बल 211 दिवसांची अग्निपरीक्षा! शनि साडेसातीचा अंतिम टप्पा गेमचेंजर, 'या' 5 चुका चुकूनही करू नका, ज्योतिषशास्त्र
एक 'अशी' रास, जिची तब्बल 211 दिवसांची अग्निपरीक्षा! शनि साडेसातीचा अंतिम टप्पा गेमचेंजर, 'या' 5 चुका चुकूनही करू नका, ज्योतिषशास्त्र
Embed widget