मुंबई: सोमवारच्या घसरणीनंतर आज शेअर बाजार सावरल्याचं चित्र आहे. आज शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 696 अंकांनी वधारला आहे तर निफ्टीही 197 अंकानी वधारला आहे. सेन्सेक्समध्ये 1.22 टक्क्यांची वाढ होऊन तो 57,989 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 1.16 टक्क्यांची वाढ होऊन तो 17,315 वर पोहोचला आहे. 

Continues below advertisement


आज 1573 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 1745 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 99 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही. 


आज बाजार बंद होताना आयटी, ऑटो, बँक, ऑईल अॅन्ड गॅस या क्षेत्रातील शेअर्समध्ये एक टक्क्यांची वाढ झाली आहे.. तर रिअॅलिटी सेक्टरच्या शेअर्समध्ये एक टक्क्याची घसरण झाल्याचं दिसून आलं आहे.  


मंगळवारी शेअर बाजारात Tech Mahindra, BPCL, Tata Motors, Reliance Industries आणि IOC या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये मोठी वाढ झाली असून  HUL, Nestle India, Britannia Industries, Cipla आणि Divis Lab या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये घसरण झाली आहे.


या कंपन्यांचे शेअर्स वधारले



  • Tech Mahindra- 3.95 टक्के

  • BPCL- 3.14 टक्के

  • Tata Motors- 2.90 टक्के

  • Reliance- 2.58 टक्के

  • IOC-  2.25 टक्के


या कंपन्यांचे शेअर्स घसरले



  • HUL- 2.81 टक्के

  • Nestle- 2.50 टक्के

  • Britannia- 2.44 टक्के

  • Cipla- 1.69 टक्के

  • Divis Labs- 0.17 टक्के


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha