मुंबई: गेल्या आठवड्यातील पडझडीनंतर आता या आठवड्याच्या सुरुवातीला शेअर बाजारात काहीशी वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. आज शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 180 अंकांनी वधारला तर निफ्टीही 60 अंकानी वधारला आहे. सेन्सेक्समध्ये 0.34 टक्क्यांची वाढ होऊन तो 52,973 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 0.38 टक्क्यांची वाढ होऊन तो 15,842 वर पोहोचला आहे.
आज 2180 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 1138 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 172 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही.
आज बाजार बंद होताना कॅपिटल गुड्स, ऑटो, उर्जा, रिअॅलिटी, सार्वजनिक बँका या क्षेत्रातल्या शेअर्समध्ये 1-3 टक्क्यांची वाढ झाली. तर आयटी आणि एफएमजीसी सेक्टरच्या शेअर्समध्ये विक्री झाल्याचं दिसून आलं आहे. BSE मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही 1 टक्क्याची वाढ झाली आहे.
सोमवारी शेअर बाजारात Eicher Motors, Apollo Hospitals, NTPC, UPL आणि Bajaj Finance या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली असून UltraTech Cement, Shree Cements, Asian Paints, Grasim Industries आणि ITC या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली आहे.
या कंपन्यांचे शेअर्स वधारले
- Eicher Motors- 7.62 टक्के
- Apollo Hospital- 3.92 टक्के
- NTPC- 2.84 टक्के
- UPL- 2.65 टक्के
- Bajaj Finance- 2.35 टक्के
या कंपन्यांचे शेअर्स घसरले
- UltraTechCement- 2.97 टक्के
- Shree Cements- 2.59 टक्के
- Asian Paints- 2.09 टक्के
- ITC- 1.74 टक्के
- Grasim- 1.55 टक्के
शेअर बाजाराची सुरुवात चांगलीजागतिक शेअर बाजारात दिसत असलेल्या सकारात्मक संकेताच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजाराची चांगली सुरुवात झाली. भारतीय शेअर बाजाराची सुरुवात झाल्यानंतर सेन्सेक्स 202.34 अंकानी वधारला. सेन्सेक्स 52,995.96 अंकावर सुरू झाला. निफ्टी निर्देशांकात 62 अंकानी वाढ झाली.
महत्त्वाच्या बातम्या: